जामखेड ब्रेकिंग : कर्जत-जामखेडच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, अखेर मधुआबांचा निर्णय ठरला, येत्या 23 रोजी प्रा मधुकर आबा राळेभात यांचा भाजपात होणार जाहीर प्रवेश !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । रोहित पवारांच्या हिटलरशाही कारभाराविरोधात बंडाचा पहिला झेंडा फडकावणारे राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख प्रा मधुकर (आबा) राळेभात हे कोणत्या पक्षात प्रवेश करणार? आबा निर्णय कधी घेणार ? याची मतदारसंघाला गेल्या महिनाभरापासून उत्सुकता लागली होती. अखेर आबांनी आपला पुढील राजकीय निर्णय घेतला आहे. येत्या २३ रोजी आबा भाजपात प्रवेश करणार आहेत. हा सोहळा मुंबईत पार पडणार आहे.

Jamkhed Breaking, biggest news in politics of Karjat-Jamkhed, Finally MadhuAab's decision was made, Prof. Madhukar Aba Ralebhat will enter the BJP on the 23rd September in mumbai,

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांना आमदार करण्यासाठी ज्या नेत्यांनी जीवाचं रान केलं होतं, त्या नेत्यांमधील सर्वाधिक जनाधार असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख तथा जामखेड तालुक्याचे जेष्ठ नेते जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात यांनी आमदार रोहित पवारांच्या हुकुमशाही कार्यपध्दतीला कंटाळून २५ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेत पक्षाचा राजीनामा दिला होता.

राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर राळेभात हे कोणत्या पक्षात जाणार याची उत्सुकता शिगेला पोहचलेली होती. त्यातच राज्याचे माजी मंत्री तथा आमदार प्रा.राम शिंदे यांनी जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात यांनी भाजपात यावे अशी खुली ऑफर फेसबुकवर पोस्ट लिहीत दिली होती. त्यामुळे कर्जत-जामखेडच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला होता.

राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यापासून जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरूवात केली होती. त्यातच २ सप्टेंबर रोजी प्रा मधुकर (आबा) राळेभात व आमदार प्रा.राम शिंदे या दोन्ही नेत्यांमध्ये रत्नापुर येथे बैठक पार पडली होती. या बैठकीत आमदार शिंदे यांनी प्रा राळेभात यांना भाजपात येण्याचे निमंत्रण दिले होते.

या बैठकीनंतर बोलताना प्रा राळेभात म्हणाले होते की, राष्ट्रवादी पक्ष सोडताना मी निर्णय घेतला होता की, आता यापुढे पुन्हा रोहित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीचं काम करणार नाही, मी मला तिकीट मागत आहे. मला जर तिकीट मिळाले तर उमेदवारी करणार, तिकीट नाही मिळाले तर मी रोहित पवारांच्या विरोधातील उमेदवाराला सर्वोतोपरी मदत करणार. आजही मी त्या मतावर ठाम आहे, असे सांगत सस्पेन्स वाढवला होता.

दरम्यान, १८ सप्टेंबर रोजी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी आमदार प्रा.राम शिंदे यांच्यासमवेत जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात व काही ठराविक महत्वाच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली होती. मध्यरात्री झालेल्या या बैठकीत प्रा मधुकर (आबा) राळेभात यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याचे समजते. प्रा राळेभात हे येत्या २३ किंवा २४ सप्टेंबर रोजी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करू शकतात, अशी शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे असे वृत्त सर्व प्रथम जामखेड टाइम्सने दिले होते. त्या वृत्तावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात यांचा भारतीय जनता पार्टीत येत्या २३ रोजी दुपारी २ वाजता मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात पक्ष प्रवेश होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्र प्रभारी भुपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील,  आमदार प्रा राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात हे जामखेडच्या राजकारणातील महत्वाचे मोठे नेते आहेत. त्यांचा सामाजिक,शैक्षणिक, राजकीय व सार्वजनिक क्षेत्रातील अनूभव खूप मोठा आहे. ते कायम सामाजिक कार्यात सक्रिय असतात. सतत जनतेत रमणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या सारखा महत्वाचा जेष्ठ नेता भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्यामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजपची ताकद वाढणार आहे.

आबांचा भाजपातील प्रवेश रोहित पवारांना व त्यांच्या राष्ट्रवादीला मोठा राजकीय धक्का देणारा ठरणार आहे. आबांची मतदारसंघात मोठी राजकीय ताकद आहे. ते भाजपात प्रवेश करणार असल्याने रोहित पवारांच्या अडचणीत आता मोठी वाढ होणार आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रा राळेभात यांच्या रूपाने भाजपने रोहित पवारांना मोठा धक्का दिला आहे.