रोहित पवारांचे बंद होतील आता सारे धंदे कारण, निवडून येणार आहेत राम शिंदे, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी कविता सादर करत सांगितला कर्जत-जामखेडचा निकाल !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख : भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार प्रा राम शिंदे यांच्या प्रचारार्थ आरपीआयच्या वतीने कर्जत येथे घेण्यात आलेला कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. आमदार प्रा.राम शिंदे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे अवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. यावेळी मेळाव्यात त्यांनी सादर केलेल्या कवितेने कर्जतकरांची मने जिंकली. आठवले यांनी कर्जत जामखेडचा निकालच कवितेतून सांगितला. आठवले यांच्या या कवितेची मतदारसंघात जोरदार चर्चा रंगली आहे.

karjat Jamkhed News, All businesses of Rohit Pawar will be closed now because Ram Shinde will be elected, Union Minister Ramdas Athawale presented poem and told the result of Karjat-Jamkhed constituency,

राम शिंदेंनी केलेला विकास आठवा
आणि रोहित पवारला बारामतीला पाठवा..
रोहित पवारांचे मतदान घटवा
आणि राम शिंदेंना विधानसभेत पाठवा..
कर्जत जामखेडचे मतदार आता राहिले नाहीत अंधे
म्हणूनच निवडून येणार आहेत राम शिंदे..
रोहित पवारांचे आता बंद होतील सारे धंदे
कारण निवडून येणार आहेत राम शिंदे..
या मतदारसंघातल्या लोकांना लागले आहे राम शिंदेंचे वेड
कारण तेच जिंकणार आहेत कर्जत जामखेडचा गड
कमळाच्या फुलांनी मढवा तुम्ही आंब्याचं बेड
कारण, मी आहे आरपीआयचा हेड !

अशी कविता सादर करत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उपस्थित कार्यकर्त्यांची जोरदार दाद मिळवली. आमदार प्रा राम शिंदे यांच्या विजयात आरपीआयचा सिंहाचा वाटा राहिला पाहिजे यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे अवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.

karjat Jamkhed News, All businesses of Rohit Pawar will be closed now because Ram Shinde will be elected, Union Minister Ramdas Athawale presented poem and told the result of Karjat-Jamkhed constituency,

यावेळी पुढे बोलताना आठवले म्हणाले की, राहूल गांधी हे आरक्षण संपवण्याची भाषा करत आहेत, पण डाॅ बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणं हे येड्यागबाळ्याचं काम नाही. संविधान बदलण्याचा किंवा आमचं आरक्षण संपवण्याचा प्रयत्न जर केला तर, याद राखा मी तुमच्या पक्षाला खतम केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देत आठवले यांनी काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्यावर सडकून टीका केली.

आठवले पुढे म्हणाले, आमदार शिंदे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, महायुती सरकारमध्ये ते मंत्री बनणार आहेत, चोंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचा विकास करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. ते अहिल्यादेवींचे वंशज आहेत तर मी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वंशज आहे. विधानसभा निवडणुकीत आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या पाठीशी मोठ्या ताकदीने उभे रहावे, विरोधकांच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडता सर्वांनी आमदार शिंदे यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलावा, असे अवाहन त्यांनी केले.

karjat Jamkhed News, All businesses of Rohit Pawar will be closed now because Ram Shinde will be elected, Union Minister Ramdas Athawale presented poem and told the result of Karjat-Jamkhed constituency,

यावेळी बोलताना आमदार प्रा.राम शिंदे म्हणाले की, मी विधानपरिषदेवर आमदार होण्याआगोदर कर्जत नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये अक्काबाईनगर परिसर असेल किंवा इतर परिसर असेल त्या परिसरामध्ये जे घरं आहेत ते शासनाच्या जागेवर आहेत, आम्हाला जर मतं दिली नाहीत तर आम्ही तुमची घरे उठवू असा धमकावण्याचा प्रकार विरोधकांकडून घडला होता, पण या भागातील गोरगरिब जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याची भूमिका मी घेतली, गोरगरिबांच्या घराला हात लाव, मग तुला दाखवतो काय ते असा इशारा विरोधकांना दिला. एवढचं नाही तर या भागातील घरे नियमित व्हावीत अशी भूमिका आपण घेतली. महायुती सरकारच्या माध्यमांतून हा विषय मार्गी लावला.

कर्जत शहरललगत बौध्द, मातंग, चर्मकार व मुस्लिम बांधवांच्या सोसायट्या आहेत, त्याच्यामध्ये शेकडो एकर जमिन आहे. मागील ७५ वर्षांपासून त्या जमिनी समाजाच्या नावावर होत्या, पण २०१९ ते २०२२ च्या दरम्यान त्या जमिनीवरती महाराष्ट्र सरकार नाव लागलं, महाराष्ट्र सरकार का लागलं? कश्यासाठी लागलं? मी जर विधानपरिषदेवर गेलो नसतो आणि महायुतीचं सरकार आलं नसतं तर ह्या जमिनी त्या गड्याने लाटल्या असत्या, असे म्हणत आमदार शिंदे यांनी रोहित पवारांच्या मनसुब्यावर जोरदार हल्ला चढवला.

तु सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलास, हरकत नाही, पण आमच्या गोरगरिब, दलित, वंचित शोषित लोकांच्या जमिनी हडपायला आला का ?  त्याचं उत्तर म्हणजे ही निवडणूक आहे. आपल्या भागात आलेले हे परकीय तुमचा आमचा कोणाचा विकास करायला आले नसून ते स्वता:चा स्वार्थ साधण्यासाठी आलेले आहेत. लोकांवर वेगवेगळ्या पध्दतीचा दबाव आणि दडपशाही करण्यासाठी ते आलेले आहेत, त्यांना आता धडा शिकवण्यासाठी आपल्याला एकजूट दाखवावी लागेल. भविष्यात आपल्याला डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा पुढे घेऊन जायची आहे. त्यामुळे भिमसैनिकांनो परकीय अतिक्रमण परतवून लावण्यासाठी सज्ज व्हा, असे अवाहन आमदार शिंदे यांनी यावेळी बोलताना केले.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कर्जतमध्ये ज्या ठिकाणी भेट दिली होती, त्या ठिकाणी ४५ लाख रूपये निधी देऊन बाबासाहेब आंबेडकर भवन बांधलं, त्याचबरोबर मतदारसंघात आंबेडकर भवन व बौध्द विहार बांधण्यासाठी १० कोटी रूपये निधी मंजुर करून आणला, त्याचबरोबर जामखेड शहरात अत्याधुनिक बौध्द विहार बांधण्यासाठी दीड कोटीचा निधी दिलाय, हे काम सुरु आहे. भविष्यात अनेक कामे मार्गी लावायची आहेत, मी आपला आहे, आपल्याशी कधीही प्रतारणा करणार नाही, तुमचा मानसन्मान वाढवण्यासाठी मी सदैव तत्पर राहिन, तुमची साथ मला द्या, मी तुमच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभा असेन असा शब्द देत शिंदे यांनी भूमिपुत्राला साथ द्या, अशी साद यावेळी आरपीआयच्या कार्यकर्त्यांना घातली.

यावेळी माजी खासदार अमर साबळे, विजय वाकचौरे  श्रीकांत भालेराव, अंबादास पिसाळ, पै प्रवीण घुले  विक्रम शेलार, काकासाहेब तापकीर, सुनील साळवे, ॲड कैलास शेवाळे, संजय भैलूमे बापू नेटके मेजर, संध्याताई सोनवणे, हर्षल शेवाळे, शशिकांत पाटील, दादा सोनमाळी, विशाल काकडे, धनंजय मोरे, अंकुश भैलुमे, नंदकुमार नवले, दत्ता कदम, विक्रमराजे भोसले, सुनील यादव, सागर कांबळे, आबा पाटील, पुंडलिक गंगावणे, नितीन पाटील, माणिक जायभाय, बंडा मोरे, सचिन सटाले, अशोक जायभाय, लखन भैलुमे, रवींद्र दामोदरे,नंदलाल काळदाते, बजरंग कदम, दत्ता मुळे, संतोष गव्हाळे, बाळासाहेब शिंदे, या प्रमुख पदाधिकाऱ्यासह मतदारसंघातील हजारो आरपीआयचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.