Karjat Jamkhed News : आमदार राम शिंदेंनी गाजवले कर्जतचे मैदान, सांगता सभेत शरद पवार व रोहित पवारांचा जोरदार समाचार, वाचा राम शिंदेंच्या भाषणातील सर्व मुद्दे

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी थंडावल्या. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार प्रा.राम शिंदे यांच्या प्रचारार्थ कर्जत शहरात ‘अतिविशाल’ सांगता सभा पार पडली. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सभेत आमदार राम शिंदे यांनी कर्जतचे मैदान गाजवले. या सभेतून आमदार शिंदे यांनी विकास कामांवर भाष्य करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. आमदार शिंदे यांच्या याच भाषणाची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगली आहे. आमदार शिंदे हे आपल्या भाषणात नेमकं काय म्हणाले? जाणून घेऊयात सर्व मुद्दे !

Karjat Jamkhed News, MLA Ram Shinde stormed the grounds of Karjat, said Sharad Pawar and Rohit Pawar's strong attack in the meeting, read all points of Ram Shinde speech,

ते म्हणतात मी दहा वर्षांत मी काय केलं, ऐका पवार साहेब मी सांगतो काय केलं ते, दोन्ही तालुक्यात तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, पोलिस स्टेशन, होस्टेल, कोर्ट बांधले, अमरापूर ते भिगवण, कोंभळी ते कर्जत, मतदारसंघात पाच ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले, मतदारसंघातील सगळी गावं पक्या रस्त्याने जोडण्याचं काम केलं, कर्जतची पाणी योजना केली, जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवली यामुळे मतदारसंघ टँकरमुक्त झाला. देऊळवाडीला 400 केव्हीचा 365 कोटी रूपये खर्च करून वीज केंद्र उभारले, त्याच्यातून देखील तुमच्या बारामतीला लाईट मिळतेय, ऐका पवार साहेब माझ्या कामाचा हिशोब तुमचा नातू म्हणला MIDC आणतो पण त्याला ते जमलं नाही, पण या पठ्ठ्याने MIDC आणूनच दाखवली.

Karjat Jamkhed News, MLA Ram Shinde stormed the grounds of Karjat, said Sharad Pawar and Rohit Pawar's strong attack in the meeting, read all points of Ram Shinde speech,

ॲड कैलास आण्णा शेवाळे यांच्या गावात होऊ घातलेली midc जर रद्द केली असती तर ते आज आपल्या व्यासपीठावर दिसले असते का ?

कोंभळी आणि खांडवीला midc केली आणि आजच्या भाषणामध्ये सांगतात आम्ही midc केली तर तिथं उद्योग आणू, पवार साहेब तुम्ही राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री होतात तेव्हा तुम्ही कर्जत जामखेड साठी काय केलं याचा हिशोब द्या आधी.

१९९५ ला युतीचे सरकार आल्यावर रूईगव्हाणच्या पुढे कुकडीचा कॅनाॅल आला. पण पवार साहेब तुमच्या नेतृत्वात १५ वर्षे कुकडी प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली नाही, पण मी मंत्री झाल्यानंतर ३ हजार ९०० कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. २५ वर्षानंतर भूसंपादनाचे पैसे मिळाले. अस्तरीकरण झालं.

Karjat Jamkhed News, MLA Ram Shinde stormed the grounds of Karjat, said Sharad Pawar and Rohit Pawar's strong attack in the meeting, read all points of Ram Shinde speech,

शिवाजीराव नागवडे यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमात ३१८ कोटी रूपयांच्या टेंभू ते येडगाव टनेलला (बोगद्याला) मी मंत्री असताना मंजुरी दिली होती, तेव्हा तुम्ही सांगितलं होतं १५ दिवसांत काम चालू करू, पण ते काम तुम्ही पुर्ण केलं नाही,  आता मीच ते काम पुर्ण करणार

आमचा तालुका आठमाही कुकडीखाली आहे. भविष्य काळात तो बारमाही करण्यासाठी मी प्रयत्न करणार,  तुमच्या नातवाला निवडून दिलं तर त्याने कुकडी आवर्तनाचा बट्ट्याबोळ करून टाकला.

ते सांगतात गडकरी साहेबांनी सांगितलं आमच्या लग्नात तुम्ही लाडू का वाटले राम शिंदेंना कळालचं नाही, अरे खुळ्या तुला कळलं का ? राम शिंदे या जिल्ह्याचा पालकमंत्री होता त्याकाळात स्टेट हायवेचा नॅशनल हायवे झाला, माझ्या काळात त्याला प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता मिळाली. पहिल्या फेजचं टेंडर निघालं, काम सुरू झालं. माझ्या काळात मार्गी लागलेलं ते काम आहे, समजलं का खुळ्या..

Karjat Jamkhed News, MLA Ram Shinde stormed the grounds of Karjat, said Sharad Pawar and Rohit Pawar's strong attack in the meeting, read all points of Ram Shinde speech,

मंत्री झाल्यावर 36 वर्षानंतर माळढोकचे आरक्षण उठवण्याचे काम मी केले. तसेच तुकाई उपसा सिंचन योजनेला मी मंजुरी आणली. पण ती योजना रोहित पवारने बंद पाडली. पवार साहेब जरा माहिती घ्या तुमच्या नातवाने काय कारनामे केले ते.

हा माझा हिशोब आहे, शेवटच्या दिवशी तरी नातवाचा हिशोब विचारायचा ना पवार साहेब.

आम्हाला म्हणतात दडपशाही दाखवतो,  कर्जत नगरपंचायत निवडणुकीत आमच्या चार ते पाच उमेदवारांचे फाॅर्म कोणी माघारी घेतले ? पक्षाच्या माणसाला हाणायला बाऊन्सर कोणी आणले होते ? जामखेडच्या सभापतीची निवड कशी झाली ?  त्यावेळी कोणीचा दबाव होता, कोणाची दडपशाही होती, कोणाची गुंडशाही होती हे माहित नाही का तुम्हाला पवार साहेब.

Karjat Jamkhed News, MLA Ram Shinde stormed the grounds of Karjat, said Sharad Pawar and Rohit Pawar's strong attack in the meeting, read all points of Ram Shinde speech,

मी आमदार नव्हतो तेव्हा तो अधिकारी आणि कार्यकर्त्यांना म्हणायचा आम्ही कोण आहे माहित आहेत का ? पवारांशी गाठ आहे. पण आता तुझी आमच्याशी गाठ आहे.

रयत शिक्षण संस्था राजकीय अड्डा बनवला. आमची मुलं शिक्षण घेतात. पण त्यांना तो सैराटव  नाचवतो. आमची पोरं नासवण्याचे काम पाच वर्षांत त्याने केले.

मी सालगड्याचा पोरगाय, मी नुसतं एक घर बांधलं तर 10 वर्षे झाले म्हणत्येत घर बांधलं घर बांधलं पण पवार साहेब तुमच्या नातवाने 2 वर्षांत 3 एकरात बंगला बांधलाय.. ते तुम्ही कसे विसरले..

पवार साहेब माझ्या बापाच्या नावावर जी जमिन होती तेवढीच जमिन माझ्याकडे आहे, पण तुमच्या नातवाने मतदारसंघातील जमिनी हाणल्यात.. कुंडलिक जायभायची जमिन तुमच्या नातवाने हानली..  जायभाय यांनी निवडणूकीच्या तोंडावर उपोषण केलं.. त्याचा जाब तुम्ही नातवाला का विचारला नाही..

Karjat Jamkhed News, MLA Ram Shinde stormed the grounds of Karjat, said Sharad Pawar and Rohit Pawar's strong attack in the meeting, read all points of Ram Shinde speech,

हा राम शिंदे गरिब आहे. माझा बाप सालकरी होता. माझा जन्म सालकरी बापाच्या पोटी जन्म झाला त्यात माझी काय चुकयं?  तुमचा नातू दमदाटीची भाषा करतोय, मतमोजणीला नका येऊ म्हणतोय, पण मी या सभेत जनतेला विचारतोय मी मतमोजणीला जाऊ का? यावर जनतेने दोन्ही हात उंचावून हो म्हणून तीनदा नारा दिला..