Karjat Jamkhed News : कर्जत तालुक्यातील करमनवाडीत राजकीय भूकंप, सरपंच उपसरपंच,3 ग्रामपंचायत सदस्यांसह जेष्ठ व युवा कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : ऐन दिवाळीत कर्जत व जामखेड या दोन तालुक्यांमध्ये राजकीय भूकंपाचे मोठे धमाके सुरू आहेत. आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत मतदारसंघातील अनेक गावांमधील युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचे भारतीय जनता पार्टीत जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे. रोहित पवारांच्या हुकुमशाहीविरोधात सर्वसामान्य जनत एकवटली आहे. आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या पक्षप्रवेशामुळे रोहित पवारांना दररोज धक्क्यांवर धक्के बसताना दिसत आहेत.
कर्जत तालुक्यातील करमनवाडीमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. करमनवाडीचे सरपंच, उपसरपंच व 3 ग्रामपंचायत सदस्य व इतर प्रमुख जेष्ठ व तरूण कार्यकर्त्यांनी रोहित पवारांच्या मनमानी कारभाराला कंटाळून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. आमदार प्रा राम शिंदे यांना संपुर्ण करमनवाडी गावाने पाठिंबा देत भाजपात प्रवेश केला. करमनवाडीत झालेल्या या राजकीय भूकंपामुळे रोहित पवारांना जोरदार धक्का बसला आहे. हा पक्ष प्रवेश सोहळा चोंडी येथे मध्यरात्री पार पडला.
करमनवाडीचे सरपंच किसनराव रामचंद्र पुणेकर, उपसरपंच अमोल सायकर, ग्रामपंचायत सदस्य नितीन खराडे, ग्रामपंचायत सदस्य अंकुश पुणेकर, ग्रामपंचायत सदस्य नितीन पावणे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिलीप पावणे, भानुदास पावणे, गोरख पावणे, रावसाहेब पुणेकर, अनिल पुणेकर, सतिश पुणेकर, यांच्यासह सोमनाथ बोराटे, सागर सायकर, विशाल सायकर, समाधान सायकर, ओम सायकर, प्राजक्त सायकर, संदिप पवार, संभाजी पवार, दिलीप पावणे, अनिकेत पुणेकर, मयुर पुणेकर, तानाजी पवार, श्रीकांत पावणे, गणपत सायकर, गणेश पुणेकर, दादा पवार, शरद पावणे, राजु सायकर, तानाजी पवार, अक्षय पावणे, ऋषीकेश सायकर, राजु पावणे, सनी पावणे, भानुदास पावणे, अशोक सायकर, रखमाजी महारनवर यांनी आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात जाहीर प्रवेश केला.
यावेळी बाजार समिती संचालक मंगेश दादा जगताप, माजी तालुकाध्यक्ष डॉ सुनील गावडे, भाजपा तालुका उपाध्यक्ष तथा देशमुखवाडीचे माजी सरपंच बंडाभाऊ मोढळे, विजय पोटरे, शिवाजी चोरमले, अनिल गदादे, माजी सभापती प्रकाश शिंदे, पांडुरंग उबाळे सह आदी पदाधिकारी उपस्थित होते.