Karjat Jamkhed News : कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात तीन दिवसांत ४४ उमेदवारी अर्जांची विक्री, कोणी कोणी नेले उमेदवारी अर्ज ? जाणून घ्या

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Karjat Jamkhed News : 227- कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात आज तिसऱ्या दिवशी १९ उमेदवारी अर्जांची विक्री झाली. तर दिवसभरात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. गेल्या तीन दिवसांत मतदारसंघात एकुण ४४ उमेदवारी अर्जांची विक्री झाली. यामध्ये २४ उमेदवारांनी ४४ उमेदवारी अर्ज नेले तर एका उमेदवाराने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. (Karjat Jamkhed Vidhan Sabha Election 2024)

Karjat Jamkhed News, Sale of 44 nomination forms in three days in Karjat Jamkhed Assembly Constituency, who took the nomination forms? find out, vidhan sabha Nivadnuk 2024,

सोमवारी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विक्री व अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. गेल्या तीन दिवसांत २४ व्यक्तींनी ४४ उमेदवारी अर्ज नेले आहेत. यामध्ये आमदार प्रा राम शिंदे, आशाताई राम शिंदे, रोहित पवार, ॲड कैलास शेवाळे, अंबादास पिसाळ, संतोष नवलाखा, विकास राळेभात, हनुमंत पावणे, शंकर शिंदे, रविंद्र कोठारी, भाऊसाहेब सटाले, निखील जगधने, प्रा अशोक पावणे, युवराज हाके, शहाजी उबाळे, दत्तात्रय सोनवणे, स्वप्नील देसाई, ॲड गजेंद्र बागल, सतिश कोकरे, विकास मासाळ, सुहास गंगावणे, तारेक सय्यद,आप्पा पालवे या उमेदवारांनी स्वता: किंवा त्यांच्या प्रतिनिधींमार्फत उमेदवारी अर्ज नेले आहेत.

उमेदवारी अर्ज विक्री सुरु झाल्यापासून सोमवारी सोलापुर जिल्ह्यातील सतिश कोकरे या एकमेव अपक्ष उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर गेल्या दोन दिवसांत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. २९ ऑक्टोबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. तर २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

दरम्यान, कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात यंदा होणाऱ्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. भाजप – महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रा राम शिंदे हे शुक्रवारी दुपारी आपला उमेदवारी अर्ज अत्यंत साधेपणाने भरणार आहेत, कोणताही गाजावाजा न करता शिंदे हे सर्वसामान्य व्यक्ती व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.