Karjat Jamkhed News : गोरगरिब, दीन-दलित, वंचित आणि शोषितांच्या जमिनी लाटण्यासाठी टपून बसलेल्या परकीय अतिक्रमणाला परतवून लावा – आमदार राम शिंदे
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : मी विधानपरिषदेवर आमदार होण्याआगोदर कर्जत नगरपंचायत निवडणुकीमध्ये अक्काबाईनगर परिसर असेल किंवा इतर परिसरामध्ये आम्हाला जर मतं दिली नाहीत तर आम्ही तुमची घरे उठवू असा धमकावण्याचा प्रकार विरोधकांकडून करण्यात आला होता, पण त्यावेळी गोरगरिब जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याची आपण भूमिका घेतली. गोरगरिबांच्या घराला हात तर लाव, मग तुला दाखवतो, काय ते, असा इशारा त्यावेळी मी विरोधकांना दिला होता. एवढचं नाही तर या भागातील घरे नियमित व्हावीत अशी भूमिका आपण घेतली. महायुती सरकारच्या माध्यमांतून हा विषय मार्गी लावला, तुमचा आशिर्वाद माझ्या पाठीशी कायम राहू द्या, मी सदैव तुमच्या पाठीशी असेन असे अवाहन आमदार प्रा राम शिंदे यांनी केले.
मंगळवारी आरपीआयच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला. यावेळी भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार राम शिंदे बोलत होते.
कर्जत शहराच्या लगत बौध्द, मातंग, चर्मकार व मुस्लिम बांधवांच्या सोसायट्या आहेत,त्याच्यामध्ये शेकडो एकर जमिन आहे. मागील ७५ वर्षांपासून त्या जमिनी त्या समाजाच्या नावावर होत्या, पण २०१९ ते २०२२ च्या दरम्यान त्या जमिनीवरती महाराष्ट्र सरकार नाव लागलं, महाराष्ट्र सरकार का लागलं? कश्यासाठी लागलं? मी जर विधानपरिषदेवर गेलो नसतो आणि महायुतीचं सरकार आलं नसतं तर ह्या जमिनी त्या गड्याने लाटल्या असत्या, असे म्हणत आमदार शिंदे यांनी रोहित पवारांच्या मनसुब्यावर जोरदार हल्ला चढवला.
तु सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलास, हरकत नाही, पण आमच्या गोरगरिब, दलित, वंचित शोषित लोकांच्या जमिनी हडपायला आला का ? त्याचं उत्तर म्हणजे ही निवडणूक आहे. आपल्या भागात आलेले हे परकीय तुमची आमचा कोणाचा विकास करायला आले नसून ते स्वता:चा स्वार्थ साधण्यासाठी आलेले आहेत. लोकांवर वेगवेगळ्या पध्दतीचा दबाव आणि दडपशाही करण्यासाठी ते आलेले आहेत, त्यांना आता धडा शिकवण्यासाठी आपल्याला एकजूट दाखवावी लागेल. आपल्याला डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा पुढे घेऊन जायची आहे. त्यामुळे भिमसैनिकांनो परकीय अतिक्रमण परतवून लावण्यासाठी सज्ज व्हा, असे अवाहन आमदार शिंदे यांनी यावेळी बोलताना केले.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कर्जतमध्ये ज्या ठिकाणी भेट दिली होती, त्या ठिकाणी ४५ लाख रूपये निधी देऊन बाबासाहेब आंबेडकर भवन बांधलं, त्याचबरोबर मतदारसंघात आंबेडकर भवन व बौध्द विहार बांधण्यासाठी १० कोटी रूपये निधी मंजुर करून आणला, त्याचबरोबर जामखेड शहरात अत्याधुनिक बौध्द विहार बांधण्यासाठी दीड कोटीचा निधी दिलाय, हे काम सुरु आहे. भविष्यात अनेक कामे मार्गी लावायची आहेत, मी आपला आहे, आपल्याशी कधीही प्रतारणा करणार नाही, तुमचा मानसन्मान वाढवण्यासाठी मी सदैव तत्पर राहिन, तुमची साथ मला द्या, मी तुमच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभा असेन असा शब्द देत, शिंदे यांनी भूमिपुत्राला साथ द्या, अशी साद आरपीआयच्या कार्यकर्त्यांना घातली.
यावेळी माजी खासदार अमर साबळे, विजय वाकचौरे श्रीकांत भालेराव, अंबादास पिसाळ, पै प्रवीण घुले विक्रम शेलार, काकासाहेब तापकीर, सुनील साळवे, ॲड कैलास शेवाळे, संजय भैलूमे बापू नेटके मेजर, संध्याताई सोनवणे, हर्षल शेवाळे, शशिकांत पाटील, दादा सोनमाळी, विशाल काकडे, धनंजय मोरे, अंकुश भैलुमे, नंदकुमार नवले, दत्ता कदम, विक्रमराजे भोसले, सुनील यादव, सागर कांबळे, आबा पाटील, पुंडलिक गंगावणे, नितीन पाटील, माणिक जायभाय, बंडा मोरे, सचिन सटाले, अशोक जायभाय, लखन भैलुमे, रवींद्र दामोदरे,नंदलाल काळदाते, बजरंग कदम, दत्ता मुळे, संतोष गव्हाळे, बाळासाहेब शिंदे, सतिश साळवे या प्रमुख पदाधिकाऱ्यासह मतदारसंघातील हजारो आरपीआयचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.