जामखेडमध्ये आम आदमी पक्षाचा मास्टर स्ट्रोक ; एस टी कर्मचाऱ्यांनी धरली आम आदमी पक्षाची वाट !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । जामखेडच्या राजकारणात सोमवारी आम आदमी पक्षाने मास्टर स्ट्रोक खेळला. आपने जामखेडमधील अनेक एस टी कर्मचाऱ्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला. या राजकीय घडामोडीमुळे जामखेडमधील सर्वच राजकीय पक्षांना हादरा बसला आहे. जामखेड तालुक्यामध्ये आपला विस्तार करण्यासाठी आम आदमी पक्ष आक्रमक झाल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे.

राज्यातील एस टी कर्मचारी संपावर असल्यामुळे लालपरीचे चाके बंद आहेत. एस टी कर्मचारी आणि सरकार यांच्यात अजूनही समेट झालेला नाही. सहा महिन्यांपासून लालपरीचे चाके बंद असल्याने राज्यातील जनता त्रस्त आहे. खासगी वाहतुकदारांकडून जनतेची लूट सुरू आहे.अश्या परिस्थितीत एस टी कर्मचाऱ्यांचा संप मिटणे आवश्यक आहे. परंतू एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघालेला नाही. यामुळे चिडलेल्या कामगारांनी प्रस्थापित पक्षांविरोधात भूमिका घेतली आहे. आता कामगारांनी न्याय मिळवण्यासाठी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचा सहारा घेतला आहे.

एस टी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या अंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून आम आदमी पार्टी पक्षाने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला.कुठलेही राजकारण होणार नाही याची दक्षता घेतली. यामुळे जामखेड बस आगारात अंदोलन करत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आम आदमी पक्षात जाहीर प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असे आपचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष नवलाखा म्हणाले.

जामखेडमध्ये आम आदमी पक्षाचा मास्टर स्ट्रोक, master stroke of Aam Aadmi Party in Jamkhed, ST worker joins Aam Aadmi Party,

यावेळी एसटी कामगार सेनेचे माजी जिल्हाकार्यध्यक्ष प्रकाश गावडे, पप्पू घायतडक, आशोक वारे, हनुमंत अंधारे, विष्णू घूले, दिलीप वारे, शिवदास टेकाळे, विठ्ठल जायभाय, जीवन घायतडक, कल्याण थोरात, किरण भांगे, संजय खोत, मोहन ढोले, रघुनाथ वारे, चंदु वारे, योगेश पोपळे, हनुमंत आंधाळे, सचिन शिंदे, दता जाधव, सुनिल जगताप ,नारायण जायभाय, दिनकर उघडे, सुभाष नागरगोजे, योगेश कानडे, नारायण जायभाय, खटावकर, किरण जायभाय, सिकंदर बनसोडे, किरण उघडे सह आदी एस टी कर्मचाऱ्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. यावेळी तालुकाध्यक्ष बजरंग सरडे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले.

राज्यात एसटी कामगारांचे गेल्या पाच महिन्यांपासून आंदोलन चालू आहे. राज्यातील सरकारने आद्याप दखल घेतली नाही. कामगारांच्या समस्यांवर एकही राजकीय पक्ष मनापासून सहकार्य करत नाही.राज्यातील 119 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या असून याकडे सरकार दुर्लक्ष करीत आहेत. आम आदमी पार्टीचे नेतृत्व व धोरण सक्षम आहे. हा पक्ष कामगारांना न्याय मिळवून देऊ शकतो. त्यामुळे सर्व गट तट बाजूला ठेवून अंदोलनातील एसटी कामगारांनी जाहीरपणे आम आदमी पार्टीत प्रवेश केला आहे असे प्रकाश गावडे म्हणाले.