नरेंद्र मोदींचा मास्टर स्ट्रोक: 12 मंत्र्यांना धाडले घरी (Narendra Modi’s master stroke: 12 ministers rushed home)
बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार(Narendra Modi's master stroke: 12 ministers rushed home)
नवी दिल्ली : बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार असल्याने सकाळपासून दिल्लीच्या राजकीय वर्तुळात मोठी हालचाल सुरू होती. बैठकांचा जोर वाढत होता. मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू असताना बुधवारी देशाच्या राजकारणाचा रंगच बदलला तो केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनामा सत्राने. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोन जाताच राजीनामा सत्र सुरू झाले होते. मंत्रिमंडळात कोणत्या चेहर्यांना संधी दिली जाणार यापेक्षा कोणत्या मंत्र्यांना घरी धाडलं गेलं याचीच जोरदार चर्चा आता देशात रंगली आहे.(Narendra Modi’s master stroke: 12 ministers rushed home)
मंत्रीमंडळ विस्ताराच्या घडामोडींचे केंद्र असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानावर बैठकांचा धडाका सुरू आहे. अश्यातच मोदी यांनी 12 मंत्र्यांना घरी धाडले आहे. यातील आरोग्य मंत्री डाॅ हर्षवर्धन यांच्याकडे नव्या खात्याची जबाबदारी येणार आहे.(Narendra Modi’s master stroke: 12 ministers rushed home)
खालील मंत्र्यानी सोपवले राजीनामे (Narendra Modi’s master stroke: 12 ministers rushed home)
1) रमेश पोखरियाल निशंक
2) संतोष गंगवार
3) देबोश्री चौधरी
4) संजय धोत्रे
5) बाबुल सुप्रियो
6) रावसाहेब दानवे-पाटील
7) सदानंद गौड़ा
8) रतन लाल कटारिया
9) प्रताप सारंगी
10) डॉ हर्षवर्धन
11) अश्विनी चौबे
12) थावरचंद गहलोत