NCP 1st List 2024 : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, राष्ट्रवादीच्या 38 उमेदवारांच्या यादीत कोणाला संधी? जाणून घ्या
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्याची लगबग वेगाने सुरु आहे.भाजपने ९९ उमेदवारांची यादी जाहीर करत आघाडी घेतली होती. त्यानंतर आता इतर सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची घोषणा करण्यास सुरूवात केली आहे. बुधवारी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ३८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, नरहरी झिरवाळ, धनंजय मुंडे, या मोठ्या नेत्यांना रिंगणात उतरवले आहे. अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यात पक्षाने 3 जागांवर आपले उमेदवार घोषित केले आहेत. यामध्ये अहमदनगर शहरासाठी संग्राम जगताप, अकोले मतदारसंघातून डाॅ किरण लहामटे तर कोपरगावमधून आशुतोष काळे यांना रिंगणात उतरवले आहे.
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची शिदोरी जोपासून आणि थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे पाऊल टाकत आहोत. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येत आहे. मी सर्व उमेदवारांना त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, असे ट्विट राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी केले आहे. यासोबतच त्यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली.