Big Breaking news : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंना कोरोनाची लागण (NCP MP Supriya Sule infected with corona)

Big breaking news | जामखेड टाईम्स वृत्तसेवा | सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात माहिती स्वतः सुप्रिया सुळे यांनी स्वतः ट्विटरवरून दिली आहे. (NCP MP Supriya Sule infected with corona)

सुप्रिया सुळे यांच्या प्रकृतीची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सुप्रिया सुळे यांच्यासह त्यांचे पती सदानंद सुळे (Sadanand Sule) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं आहे. त्यात सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, ‘मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. (NCP MP Supriya Sule Corona Positive)

संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घावे, आवाहन करून त्या म्हणाले, काळजी घेण्याचं कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी, ही नम्र विनंती, तसंच काळजी घ्या असंही त्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. (NCP MP Supriya Sule Corona Positive)

राज्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही कोरोना शिरकाव झाला होता. काही आमदार आणि विधानसभेतील आणि मंत्रालयातील कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तसेच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड याह्या (Education Minister Varsha Gaikwad Corona positive) कोरोनाबाधित आढळून आल्या आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व त्यांचे पती सदानंद सुळे हे दोघे कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

मंगळवारी दिवसभरात राज्यात कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. दिवसभरात एकुण 02 हजार 172 रूग्ण आढळून आले होते. अनेक महिन्यांनंतर राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यामुळे राज्यासमोर धोक्याची घंटा वाजू लागली आहे.

राज्यात मंगळवारी दिवसभरात 22 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात राज्यात एकुण 01 हजार 98 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आजअखेर राज्यात 65 लाख 04 हजार 831 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज अखेर 01 लाख 11 हजार 232 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 910 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्याची चिंता वाढवलेल्या ओमिक्रॉनने आज महाराष्ट्राला मोठा दिलासा दिला. राज्यात मंगळवारी दिवसभरात एकही रूग्ण आढळून आला नाही. सध्या राज्यात सक्रीय ओमिक्रॉन रूग्णांची संख्या 167 इतकी आहे.

राज्यात मंगळवार अखेर 11 हजार 492 सक्रीय रूग्णांची संख्या झाली आहे.  राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.65 टक्के आहे. तर मृत्यू दर 2.12 टक्के इतका आहे.

राज्यात सर्वाधिक रूग्ण मुंबई परिसरात आहेत. राज्यात गेल्या काही महिन्यांनंतर आज कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. एकाच दिवशी दोन हजारपेक्षा जास्त रूग्ण सापडू लागल्याने राज्याच्या चिंता आता वाढल्या आहेत. राज्यात तिसऱ्या लाटेचे हे तर संकेत नाहीत ना ? अशी भीती आता व्यक्त केली जाऊ लागली आहे.