जामखेड टाईम्स वृत्तसेवा । 4 जानेवारी । राष्ट्रवादी युवकचे अहमदनगर जिल्हा सरचिटणीस शंकरशेठ गदादे यांचा 34 वाढदिवस जामखेड तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
समाजात धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्याची परंपरा झपाट्याने वाढली आहे. वाढदिवसावर नाहक अनावश्यक खर्च करून तथाकथित खोट्या प्रतिष्ठेचा दिखावा मांडण्याचे फॅड वाढले आहे. अश्या परिस्थितीत सामाजिक दायित्वाच्या जबाबदारीतून वाढदिवस साजरा करण्यासाठी अरणगाव येथील राष्ट्रवादीचे युवा नेते शंकरशेठ गदादे हे पुढे सरसावले.
गदादे यांनी आपल्या 34 व्या वाढदिवसानिमित्त जामखेडमधील एका सामाजिक संस्थेतील मुलांसाठी 15 दिवस पुरेल एवढ्या धान्याची मदत दिली.
शंकरशेठ गदादे यांनी समाजातील वंचित उपेक्षित घटकांसोबत आपला वाढदिवस साजरा करत समाजिक बांधिलकीतरूणांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. गदादे यांच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
कोण आहेत शंकर गदादे ?
शंकर गदादे हे जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील रहिवासी असून ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस म्हणून राजकारणात कार्यरत आहेत. तसेच अरणगाव तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष तसेच विघ्नहर्ता हाॅस्पीटल & मेडिकलचे संचालक आहेत. सामाजिक व राजकीय वर्तुळात त्यांना शंकरशेठ या नावाने ओळखले जाते. गदादे यांच्या पत्नी रूपाली गदादे ह्या अरणगाव ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्या आहेत. शंकरशेठ गदादे हे आमदार रोहित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून तालुक्याच्या राजकारणात ओळखले जातात.