list of 12 MLAs | political game | राजु शेट्टींचा पत्ता होणार कट ? राष्ट्रवादी समोर नवा पेच, अजित पवार म्हणतात..

स्वाभिमानी वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत ?

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : list of 12 mlas,vidhanparishad, political game | राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा घोळ अद्यापही कायम आहे.आठ महिने उलटूनही राज्यपालांनी १२ आमदारांची यादी मंजूर केलेली नाही. त्यातच आता तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे या यादीतील काही जणांचा पत्ता कट होणार अशी शक्यता वाढली आहे.जर असे झाले तर याची जबर किमंत राष्ट्रवादीला मोजावी लागू शकते असे आता राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. (Maharashtra governor has not approved the list of 12 MLAs.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (ajit pawar) एका नियमाचा संदर्भ देत सूचक विधान केलं आहे. ‘निवडणुकीत पराभूत झालेल्या व्यक्तीला राज्यपाल आमदार म्हणून नियुक्त करत नाहीत असा नियम असल्याची माहिती मिळाली आहे.आम्ही तथ्य तपासत आहोत. शहानिशा सुरू आहे.यात जर काही अडचण आली, तर मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील,’ असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांचा पत्ता कापला जाणार की काय अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. (list of 12 mlas,vidhanparishad, political game)

दिलेला शब्द पाळायचा की नाही हे आता राष्ट्रवादीने ठरवावे – raju shetty

लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत माझी शरद पवार (Sharad pawar) यांच्यासोबत बैठक झाली होती. त्यावेळी राष्ट्रवादीने एक लोकसभा मतदारसंघ आमच्यासाठी सोडावा, अशी आमची मागणी होती. मात्र, त्याऐवजी विधानपरिषदेची जागा देण्याचे शरद पवार यांनी मान्य केले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक जागा द्यायची हा समझोता लोकसभा निवडणुकीच्या (loksabha election) आधी झाला होता. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले. दिलेला शब्द पाळायचा की नाही हे आता राष्ट्रवादी काँग्रेसने (ncp) ठरवावे, असे राजू शेट्टी म्हणाले.

राजु शेट्टी पुन्हा वेगळी चूल मांडणार ?

आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडी कायम राहिली, तर शेट्टी यांचा प्रभाव असलेल्या हातकणंगले व बुलडाणा या दाेन्ही जागा स्वाभिमानीला मिळण्याची शक्यता कमी आहे, कारण या दाेन्ही जागांवर सध्या शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार आहेत. त्यामुळे स्वाभिमानी वेगळी चूल मांडण्याची शक्यता अधिक आहे. स्वाभिमानीसमोर swabhimani shetkari sanghatna)  तिसरी आघाडी व भाजप (bjp) हे पर्याय आहेत.नव्या कृषी कायद्यावरून शेतकरी वर्गात मोठा असंतोष आहे.पण महाराष्ट्रात मोठे अंदोलन उभे करण्यात स्वाभिमानीला यश आलेले नाही.(list of 12 mlas, vidhanparishad, political game)

राजु शेट्टींचे नाव वगळले नाही – ajit pawar

राज्यपालांकडे दिलेल्या यादीतील बारा आमदारांपैकी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह काहींची नावे वगळल्याची चर्चा आहे. याबाबत विचारले असता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “यात कोणतेही तथ्य नाही.

महाराष्ट्र भारताच्या बाहेर आहे का ?

महापुराने शेतकऱ्यांची वाताहत झाली असून, हे आपत्कालीन संकट शासनास कळत नाही का? सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा जलसमाधी घेणारच, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. रुकडी येथे ‘आक्रोश शेतकऱ्यांचा, परिक्रमा पंचगंगेची’ या पदयात्रेप्रसंगी ते बोलत होते.पदयात्रेच्या तिसऱ्या दिवशी गावागावातील शेतकरी सहभागी झाले होते केंद्रीय अर्थमंत्री बजेट सादर करीत असताना आपत्कालीन निधी या आयोगाकडे वर्ग करीत असते. केंद्र सरकारने आपत्कालीन निधीमधून महाराष्ट्राला मदत अद्यापही दिलेली नाही. मग महाराष्ट्र भारताच्या बाहेर आहे का, असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला.(list of 12 mlas,vidhanparishad, political game)

 

web title: list of 12 mlas,vidhanparishad, political game