Mla Rohit Pawar birthday | केक कापू नका पण त्या ऐवजी वह्या पुस्तकं द्या – आमदार रोहित पवारांचे कार्यकर्त्यांना अवाहन
जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख | आमदार रोहित पवार यांचा 29 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या ( Mla Rohit Pawar birthday) निमित्ताने कर्जत – जामखेड मतदारसंघासह राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह रोहित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याची जय्यत तयारी केली आहे.
आमदार रोहित पवार यांचा वाढदिवस (Mla Rohit Pawar birthday)जंगी साजरा होणार असल्याचेच दिसत आहेत. वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी कार्यक्रमांची आखणी करण्यात कार्यकर्ते व्यस्त आहे. निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, रक्तदान शिबिर यासह आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
मात्र आपल्या वाढदिवसाच्या (Mla Rohit Pawar birthday) पुर्वसंध्येला आमदार रोहित पवार यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे. यासंबंधी त्यांनी एक ट्विट केले आहे या ट्विटमध्ये ते म्हणतात की, माझा वाढदिवस २९ सप्टेंबरला असल्याने अनेकजण केक कापण्यासाठी भेटायचं म्हणतायेत.
पण माझ्यावर प्रेम करणाऱ्या या मंडळींना माझं आवाहन आहे की,केक ऐवजी तेवढ्या किंमतीची वह्या-पुस्तकं मला दिली किंवा आपल्या आजूबाजूच्या गरजू विद्यार्थ्यांना दिले तर तोच माझा खऱ्या अर्थाने वाढदिवस साजरा होईल असे सांगत वाढदिवसाच्या निमित्ताने केक न कापण्याचे अवाहन आमदार रोहित पवार यांनी केले आहे.
राज्यात शिक्षणापासून वंचित असलेली लाखो मुलं आहे. तर गोरगरिब घटकातील लाखो गरजू मुलं बिकट आर्थिक परिस्थितीतही शिक्षण घेत आहेत. अश्या गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं भेट दिल्या खर्या अर्थाने गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आनंद होईल हे मात्र खरं !
माझा वाढदिवस २९ सप्टेंबरला असल्याने अनेकजण केक कापण्यासाठी भेटायचं म्हणतायेत. पण माझ्यावर प्रेम करणाऱ्या या मंडळींना माझं आवाहन आहे की,केक ऐवजी तेवढ्या किंमतीची वह्या-पुस्तकं मला दिली किंवा आपल्या आजूबाजूच्या गरजू विद्यार्थ्यांना दिले तर तोच माझा खऱ्या अर्थाने वाढदिवस साजरा होईल.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 19, 2021