MLA Rohit Pawar said on Union Minister narayan Rane issue | केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मोठे नेते – आमदार रोहित पवार

 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : MLA Rohit Pawar said on Union Minister narayan Rane issue | भाजप व महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रकरणावर आपापली भूमिका मांडली आहे. स्वता: राणे साहेब मोठे नेते आहेत. त्यामुळे एखाद्या आमदाराचं वक्तव्य त्या ठिकाणी होणं हे योग्य ठरणार नाही. मोठे नेते बोलत असतील तर मी त्याच्यामध्ये जास्त काही बोलू शकत नाही अशी सावध प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी २५ रोजी अरणगावमध्ये बोलताना दिली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राणे यांच्यावर राज्यात ठिकठिकाणी गुन्हे दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी राणे यांना अटक केली. यानंतर राज्यात भाजप विरूध्द शिवसेना हा सामना रंगला होता. ठिकठिकाणी तोडफोडीच्या घटना घडल्या. सत्ताधारी व विरोधी गटाच्या नेत्यांनी ऐकमेकांवर जोरदार चिखलफेक केली होती. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ निर्माण झाला होता.

दरम्यान आमदार रोहित पवार हे २५ रोजी जामखेड तालुक्यातील अरणगाव भागाच्या दौर्‍यावर होते. या दौर्‍यात राणे प्रकरणानंतर झालेल्या राड्यासंदर्भात त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. MLA Rohit Pawar said on Union Minister narayan Rane issue |

MLA Rohit Pawar said on Union Minister narayan Rane issue | यावेळी आमदार पवार म्हणाले की, मोठे नेते बोलत असतील तर मी त्याच्यामध्ये जास्त काही बोलू शकत नाही अशी सावध प्रतिक्रिया देत राणे प्रकरणावरून झालेल्या तोडफोडीवर भाष्य करताना आमदार रोहित पवार म्हणाले की, तोडफोड होत असताना सर्वसामान्य लोकांना त्रास होता कामा नये, सरकारच्या मालमत्तेचे नुकसान होता कामा नये ही काळजी दोन्ही बाजुने घेणे जरुरीचे आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी बोलताना दिली.