Swarajya Dhwaj Yatra starts from Karjat on Thursday | जामखेड टाईम्स वृत्तसेवा : कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघातील ऐतिहासिक खर्डा किल्ल्याच्या (Kharda fort) परिसरात उभारल्या जाणाऱ्या जगातील सर्वात उंच अश्या भगव्या स्वराज्य ध्वजाची (Swarajya Dhwaj) यात्रा उद्यापासून कर्जत (karjat) येथून निघणार आहे. ही यात्रा देशभर जाणार आहे अशी माहिती आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी ट्वीटरद्वारे दिली आहे. (Swarajya Dhwaj Yatra starts from Karjat on Thursday)
यावेळी केलेल्या ट्विटमध्ये आमदार रोहित पवार म्हणतात की, माझ्या मतदारसंघातील खर्ड्याला मराठ्यांनी शेवटची लढाई जिंकली. या दैदिप्यमान पराक्रमाची पताका डौलाने फडकत रहावी यासाठी खर्ड्याच्या ऐतिहासिक शिवपट्टण किल्ल्यात शक्ती-भक्ती, एकता व समानतेचं प्रतीक असलेला ७४ मीटर इतका देशात सर्वांत उंच भगवा #स्वराज्य_ध्वज उभारण्यात येणार आहे.
तत्पूर्वी देशातील ७४ भक्ती-शक्तीपीठांच्या ठिकाणी पूजेसाठी यात्रा निघेल.याचा शुभारंभ उद्या कर्जतच्या संतश्री गोदड महाराज मंदिरातून होणार आहे. कोरोनाचे नियम पाळून हा कार्यक्रम होतोय. या शुभ कार्यक्रमाला आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा,ही विनंती! पुढील प्रवासाची माहिती दररोज दिली जाईल असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.
माझ्या मतदारसंघातील खर्ड्याला मराठ्यांनी शेवटची लढाई जिंकली. या दैदिप्यमान पराक्रमाची पताका डौलाने फडकत रहावी यासाठी खर्ड्याच्या ऐतिहासिक शिवपट्टण किल्ल्यात शक्ती-भक्ती, एकता व समानतेचं प्रतीक असलेला ७४ मीटर इतका देशात सर्वांत उंच भगवा #स्वराज्य_ध्वज उभारण्यात येणार आहे. pic.twitter.com/2ac9UlKgK9
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 8, 2021