कर्जत जामखेडमध्ये राजकीय युध्द पेटले; रोहित पवार (MLA Rohit Pawar)विरूध्द राम शिंदे (Ram Shinde) पुन्हा आमने सामने
ऐन गुलाबी थंडीत ग्रामपंचायत निवडणुकांमुळे कर्जत – जामखेड मतदारसंघाचे राजकीय युध्द जोरदार पेटले आहे. (Political war Karjat Jamkhed constituency) मतदारसंघावर कब्जा कुणाचा याचीच उत्सुकता शिगेला लागली आहे. त्यातच आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) व माजी मंत्री प्रा राम शिंदे (Ram Shinde) यांनी गेल्या दोन दिवसांत जामखेड (Jamkhed ) तालुक्याच्या दौऱ्यात ऐकमेकांविरोधात राजकीय आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी ( Political allegations) झाडत जोरदार वातावरण निर्मिती केली आहे. दोन्ही नेत्यांनी ऐकमेकांविरोधात जोरदार हल्लाबोल केला यामुळे मतदारसंघात राजकीय जुगलबंदीचे वातावरण भलतेच पेटले आहे. दोन्ही नेत्यांनी ऐकमेकांविरोधात दंड थोपटल्याने ग्रामपंचायत निवडणुकीचा आखाडा आता हेवीवेट बनला आहे. (The Gram Panchayat election arena has now become heavyweight)आता रोहित पवार विरूध्द राम शिंदे हा सामना (Rohit Pawar vs Ram Shinde match) राज्यात पुन्हा गाजणार असेच दिसत आहे.
दडपशाही कराला तर याद राखा – रोहित पवारांचा (MLA Rohit Pawar) इशारा
सर्वसामान्यांचा आवाज दाबायचा अन निवडून यायचं अश्या सवयी जामखेड तालुक्यातील काही भागात लागल्या आहेत. अश्या गोष्टी कुठल्याही ग्रामपंचायतीत होत असतील तर आम्ही शांत राहणार नाही, प्रशासन त्यात लक्ष घालेल.जे काय व्हायचे ते लोकशाही पध्दतीने होऊ द्या अश्या सुचना कार्यकर्त्यांना व प्रशासनाला दिल्या आहेत असे आमदार रोहित पवार म्हणाले.
ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या राज्यातील आमदारांविरोधात गुन्हे दाखल केले पाहिजेत असे वक्तव्य राम शिंदे यांनी केले होते. या वक्तव्याचा समाचार घेताना रोहित पवार म्हणाले की, त्यांना गुन्हा दाखल करायचा असेल तर करू द्या परंतु त्यांना माझ्या वक्तव्याचा मुळ विचार समजलेला दिसत नाही. कारण मतदारसंघातील कुठल्याही गावात गटातटाचे राजकारण वाढीस लागुन ही माझी भूमिका आहे.
राजकीय पोळी भाजण्यासाठी भाजपाकडून (BJP) गटातटाचे राजकारण
लोकांनी गावच्या विकासासाठी एकत्र यावं. गावकऱ्यांच्या सहमतीने ग्रामपंचायत जर बिनविरोध होत असेल तर ती चांगलीच बाब आहे. त्यामुळे प्रशासनाचा पैसा व वेळ तसेच लोकांचाही पैसा वाचेल. गावात गटतट राहणार नाही. लोकं एका विचाराने गावाच्या विकासासाठी एकत्र येतील अश्या गावांना विकासनिधीत झुकतं माप देण्याची भूमिका मी घेतली. माझा विचार हा लोकांना एकत्रित आणण्याचा आहे.गटतट मिटवण्याचा आहे. कदाचित गावामध्ये गटतट रहावेत व भाजपाची राजकीय पोळी भाजावी असा राम शिंदेंचा हेतू असु शकतो असा हल्लाबोल करत रोहित पवारांनी ग्रामपंचायतींच्या राजकारणात लक्ष केंद्रित केल्याचा इशाराच भाजपला दिला.
राम शिंदेंनी (Ram Shinde) केला रोहित पवारांवर पलटवार
आमदार रोहित पवारांनी गुरूवारी केलेल्या टिकेवर गप्प बसतील ते राम शिंदे कसले. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशीच राम शिंदेंनी भिमगर्जना करत मतदारसंघ हा भाजपचाच बालेकिल्ला आहे हे ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सिध्द होईल असा दावा केला. यावेळी बोलताना राम शिंदे म्हणाले की, भारतीय जनता पार्टी मागील 25 ते 30 वर्षांपासुन या भागात सातत्याने निवडणुका लढवत आहे.जिंकत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून जामखेड तालुक्यातील जनतेचा भाजपने विश्वास संपादन केलाय हे अनेकदा सिध्द झाले आहे. यंदाच्या निवडणुकीतही तालुक्यातील जनता मोठ्या प्रमाणात भाजपवर विश्वास दाखवेल यात कसलीच शंका नाही असा निर्धार बोलून दाखवत राम शिंदे पुढे म्हणाले की, गेल्या दीड वर्षांपासुन मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधींच्या संदर्भात जनतेच्या मनात जी चलबिचल आहे यावरून आता तरी त्यांनी स्वता:च्या आत्मिक मनाला विचारणा केली तर निश्चित स्वरूपामध्ये लक्षात येईल की ते गुंड आहेत की समाजगुंड असा खोचक टोला लागवला.
दिड वर्षापासून सोशल मिडीया इव्हेंटची नौटंकी सुरू
रोहित पवार मागील दीड वर्षात सपशेल अपयशी ठरलेले लोकप्रतिनिधी आहेत. दीड वर्षांपासुन सोशल मिडीया इव्हेंट जनता अनुभवत आहे.मागील पाच वर्षात विकासाचा सुरू असलेला गाडा कुठेतरी रूतला आहे हे जनतेला जाणवत आहे. जामखेड शहरातील खर्डा चौक ते खर्डा या रस्त्याचे मी मंजुर केलेले सहा कोटीचे काम दीड वर्षात लोकप्रतिनिधींना पुर्ण करता आले नाही असा हल्लोबोल करत मी माझ्या कार्यकाळात काय केलं हे एकदा लोकांना जाऊन विचारा मग गटातटावर बोला असा टोला राम शिंदेंनी रोहित पवारांना लगावला.
गावोगावचे राजकीय वातावरण तापले
कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा उडाला आहे. गावोगावचे राजकीय वातावरण आता चांगलेच तापले आहे. मतदारसंघात आमदार रोहित पवार गटाचे कार्यकर्ते विरूध्द माजी मंत्री राम शिंदे यांच्या गटाचे कार्यकर्ते अश्या थेट चुरशीच्या लढती होणार आहेत. तर काही ठिकाणी स्थानिक विकास आघाड्यांच्या माध्यमांतुन निवडणुका लढवल्या जातील असे चित्र आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या मैदानातून शिंदे पवार यांनी ऐकमेकांविरोधात दंड थोपटल्याने आता खर्या अर्थाने जामखेड व कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा सामना रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे.
रोहित पवारांनी दिल्या राम शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
ग्रामपंचायत निवडणुकीवरून जामखेड तालुक्यात दोन दिवसांपासून पवार व शिंदे या दोन नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाची जुगलबंदी रंगलेली असताना एक जानेवारी हा माजी मंत्री राम शिंदे यांचा वाढदिवस असल्याने राजकीय मतभेद विसरून आमदार रोहित पवारांनी राम शिंदेंना ट्विटरवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (MLA Rohit Pawar forgot his political differences and wished Ram Shinde a happy birthday) कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय युध्दात नव्या वर्षाचा पहिला दिवस हा राजकीय हाडवैर पत्करणार्या गावोगावच्या राजकीय कार्यकर्त्यांना सकारात्मक राजकारण करण्याचा संदेश देणारा ठरला आहे.
स्पेशल रिपोर्ट – सत्तार शेख, जामखेड 9960105007