Ram Shinde News : मुहूर्त ठरला ! कोणताही गाजावाजा न करता, अत्यंत साधेपणाने आमदार राम शिंदे भरणार उमेदवारी अर्ज

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Ram Shinde News : कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघात यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे संपुर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. भूमिपुत्र विरूध्द पार्सल (बाहेरचा) असा थेट सामना या निवडणुकीत होणार आहे. भूमिपुत्र आमदार प्रा राम शिंदे यांची हवा मतदारसंघात जोरदारपणे वाहत आहे. विरोधी गटात यामुळे प्रचंड अस्वस्थता आहे. त्यातच आता आमदार राम शिंदे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त ठरला आहे. आमदार शिंदे हे शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. कुठलेही शक्तिप्रदर्शन न करता अत्यंत साधेपणाने ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. (Karjat Jamkhed latest news today)

ram shinde news, MLA Ram Shinde will fill nomination form very simply without any fuss, karjat jamkhed vidhan sabha election 2024, karjat jamkhed live news today,

कर्जत-जामखेड मतदारसंघातून आमदार प्रा राम शिंदे यांना भारतीय जनता पार्टीने सलग चौथ्यांदा निवडणूकीच्या रिंगणात उतरवले आहे.यंदा होणाऱ्या निवडणूकीसाठी आमदार प्रा राम शिंदे हे उद्या २५ रोजी दुपारी १२ नंतर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याबाबत आमदार प्रा राम शिंदे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट लिहीत माहिती दिली आहे. (Ram shinde karjat jamkhed)

ram shinde news, MLA Ram Shinde will fill nomination form very simply without any fuss, karjat jamkhed vidhan sabha election 2024, karjat jamkhed live news today,

सर्व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व नेते यांच्या बरोबर चर्चा केल्यानंतर उमेदवार म्हणून उद्या शुक्रवार दि. २५, ऑक्टोबर २०२४ रोजी १२ वाजेनंतर २२७ – कर्जत – जामखेड ” जिल्हा अहिल्यानगर या मतदारसंघातून अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे. अतिशय साध्या पद्धतीने कुठलेही शक्ती प्रदर्शन न करता, सामान्य व्यक्तीच्या व पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते व उपस्थित उमेदवारी अर्ज भरून, आपण ही प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. महायुतीच्या कार्यकर्ते, पदाधिकारी व नेते या सर्वांनी नोंद घ्यावी व उपस्थित रहावे ही विनंती, असे आमदार शिंदे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. (Karjat Jamkhed Vidhan Sabha Election news today)

आमदार प्रा राम शिंदे हे शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. कुठलेही शक्तिप्रदर्शन न करता अत्यंत साधेपणाने ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

ram shinde news, MLA Ram Shinde will fill nomination form very simply without any fuss, karjat jamkhed vidhan sabha election 2024, karjat jamkhed live news today,