जामखेड टाईम्स वृत्तसेवा ( सत्तार शेख) : ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा खाली बसण्याआधीच अहमदनगर जिल्हा बँकेची (Ahmednagar District Bank) निवडणुक जाहिर झाली आहे. यामुळे आधीच गरम असलेले जामखेडचे राजकीय वातावरण आता आणखीन तापणास पुन्हा सुरूवात होणार आहे. जिल्हा बँकेचे उमेदवार कोण ? याची चर्चा आता कर्जत जामखेड मतदारसंघात रंगु लागली आहे. (Ram Shinde’s entry in District Bank ground?)
माजी मंत्री राम शिंदे हे जिल्हा बँकेच्या राजकारणात सक्रीय होणार असल्याची चर्चा जोर पकडू लागली आहे. (Ram Shinde’s entry in Ahmednagar District Bank ground?) यामुळे राम शिंदे हे जिल्हा बँकेचे उमेदवार असतील का ? हे पाहणे रंजक ठरणार आहे. सध्या विखे व शिंदे हे दोन्ही नेते भाजपात सक्रीय आहेत. विधानसभा निवडणुकीत राम शिंदेंना पराभवाचा सामना करावा लागला होता. निवडणूकीनंतर शिंदेंनी पक्षाकडे विखे गटाविरोधात तक्रार केली होती.
दरम्यान माजी मंत्री राम शिंदे यांनी जिल्हा बँकेच्या राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला तर विखे गट त्यांना पाठबळ देईल का ? की राम शिंदे हे स्वतंत्रपणे आपले अस्तित्व राखण्यासाठी सवतासुभा थाटतील ? या निवडणुकीत आमदार रोहित पवार ( MLA ROHIT PAWAR) स्वतंत्र उमेदवार देतील की विखे – पवार छुपी सहमती एक्सप्रेस धावेल ? हे अगामी काळात स्पष्ट होईल. तुर्तास राम शिंदे (Ram Shinde) जिल्हा बँकेच्या मैदानात उतरू शकतात अशी चर्चा रंगू लागल्याने पुन्हा एकदा कर्जत -जामखेडमध्ये राजकीय संघर्षाचा भडका उडणार हे मात्र नक्की.