Sandhya Sonawane News : स्टार प्रचारक म्हणून जामखेडची मुलूख मैदानी तोफ गाजवणार राज्याचं राजकारण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारकपदी संध्या सोनवणे यांची नियुक्ती !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । Sandhya Sonawane News :  राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालाय. या युध्दात बाजी मारण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. अजित पवारांच्या (Ajit Pawar NCP) राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी आपल्या स्टार प्रचारकांची ( star campaigner ) यादी घोषित केली आहे. या यादीत जामखेड (Jamkhed) तालुक्यातील एका वाघिणीचा स्टार प्रचारक म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्या वाघिणीचे नाव आहे संध्या सोनवणे. (Sanshya Sonawane NCP)

Sandhya Sonawane has been appointed as star campaigner by Nationalist Congress Party, Ajit pawar ncp, karjat jamkhed live news,

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहत असलेल्या संध्याताई सोनवणे यांची राष्ट्रवादीने स्टार प्रचारक म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्ती केली आहे. सोनवणे ह्या जामखेड तालुक्यातील रहिवाशी आहेत. यंदा होत असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सोनवणे यांच्या रूपाने जामखेडचा बुलंद आवाज राज्याच्या राजकारणात घुमताना दिसणार आहे. जामखेडची ही मुलुख मैदानी तोफ राज्याचं राजकारण गाजवणार असल्याने सोनवणे यांच्या निवडीचे सर्वच घटकांकडून जोरदार स्वागत करण्यात येत आहे.

जामखेड तालुक्यातील नायगाव येथील रहिवासी असलेल्या संध्याताई सोनवणे ह्या विद्यार्थी दशेपासून राजकारण आणि समाजकारणात सक्रीय आहेत. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी राजकारणात उडी घेतली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत त्यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडी आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेस मध्ये काम केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी केलेली अनेक अंदोलने गाजली आहेत. त्यांचा राज्यभरात मोठा मित्रपरिवार आहे.एकिकडे राजकारणात सक्रीय असताना त्या सामाजिक कार्यातही सक्रीय असतात.

उत्तम संघटन कौशल्य, सामाजिक प्रश्नांची जाण, अभ्यासपूर्ण प्रभावी वक्तृत्व शैली, महिलांच्या व युवकांच्या प्रश्नांवर सातत्याने संघर्ष, यामुळे पक्षाने यापुर्वी जिल्हा युवती अध्यक्ष केले होते. तेथे त्यांनी प्रभावी काम केल्यामुळे पक्षाने त्यांच्यावर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली. यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील तरूणाईचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संध्या सोनवणे यांची पक्षाने स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती केली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांच्या सशक्तीकरण आणि सामाजिक न्यायाच्या धोरणांना अधिक बळ मिळाले आहे.

संध्या सोनवणे यांनी युवक आणि महिला विषयक उपक्रमांमध्ये सातत्याने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात युवती काँग्रेसच्या माध्यमांतून महिला व युवतींचे मोठे संघटन उभा राहिले आहे.संघटन कौशल्य आणि प्रभावी वक्तृत्व, निडर युवा नेतृत्व यामुळे त्यांनी पक्षात विशेष ओळख आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षासाठी जोरदार प्रचार केला. त्यावेळी त्यांची अनेक भाषणे गाजली. २०२४ च्या निवडणुकीत त्या स्टार प्रचारक म्हणून मैदानात उतरणार आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार प्रा.राम शिंदे यांच्या विजयासाठी त्या गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात सक्रीय आहेत. आता स्टार प्रचारक म्हणून त्या कर्जत-जामखेडमधील अनेक सभा गाजवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. सोनवणे ह्या निवडणूक प्रचारात रोहित पवारांवर काय हल्ला चढवणार याचीच मतदारसंघाला उत्सुकता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,  प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात पक्षाची ध्येय धोरणे व विकास कामे जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी संध्या सोनवणे राज्यात झंझावाती दौरे करत आहेत. विविध घटकांशी त्या संवाद साधत आहेत. आता निवडणूक प्रचाराच्या काळात सोनवणे ह्या स्टार प्रचारक म्हणून राजकीय मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.  संध्या सोनवणे यांच्या रूपाने प्रथमच जामखेड तालुक्यातील एका तरूणीचा आवाज राज्याच्या राजकारणात घुमताना दिसणार आहे.

संध्याताई सोनवणे प्रदेशाध्यक्षा – राष्ट्रवादी युवती काँग्रेस, महाराष्ट्र

“माझ्यावर पक्षाने ठेवलेला विश्वास आणि दिलेली जबाबदारी माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. पक्षाची विचारधारा आणि सरकारने केलेली कामे मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी समर्पणाने काम करेन आणि येत्या निवडणुकीत आमचा या निवडणुकीत एक नंबरचा पक्ष पक्ष म्हणून पुढे येईल असा मला ठामविश्वास आहे.”