Shiv Sena UBT Candidate List : शिवसेना ठाकरे गटाचे ३१ उमेदवार निश्चित, संभाव्य उमेदवार यादी आली समोर, कोणत्या नेत्याला मिळणार तिकीट ? वाचा सविस्तर
Shiv Sena UBT Candidate List : एकिकडे महायुतीचा महत्वाचा घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ४१ उमेदवारांची संभाव्य यादी समोर आली आहे. आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (उबाठा) गटाचीही संभाव्य यादी समोर आली आहे. यामध्ये ३१ संभाव्य उमेदवारांचा समावेश आहे.
सोमवारी, २० ऑक्टोबर पासून विधानसभेचे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील जागा वाटप आता अंतिम टप्प्यात आले आहे. काही जागांवर घोडे अडले आहे. दिल्ली ते मुंबई बैठकांचा धडाका सुरू आहे. सर्वच पक्षांचे जागावाटप आज रात्री किंवा उद्या दुपारपर्यंत जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.
महायुतीच्या जागा वाटपात भाजपला १५० च्या आसपास जागा मिळण्याची शक्यता आहे. तर ऊर्वरीत राष्ट्रवादीला ६० तर शिवसेनेला ७८ जागा मिळू शकतात. अजूनही जागा वाटपावर चर्चा सुरू आहे. भाजपाला सर्वाधिक जागा देताना त्यांना मिळालेल्या जागांमध्ये मित्रपक्षांना सामावून घ्यावे लागणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे २६० जागांवर एकमत झाले आहे.२८ जागांचा तिढा अजूनही सुरू आहे. महाविकास आघाडडत जागा वाटपावरून मोठी धुसफुस सुरु आहे.जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी महाविकास आघाडीत बैठकांचा जोर वाढला आहे.
एकिकडे जागावाटपासाठी बैठकांचा धडाका सुरू आहे. तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ४१ उमेदवारांची संभाव्य यादी समोर आल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाच्या ३१ उमेदवारांची संभाव्य यादी समोर आली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे ३१ संभाव्य उमेदवार खालील प्रमाणे
1) आदित्य ठाकरे – वरळी
2) सुनिल राऊत – विक्रोळी
3) सुनिल प्रभू – दिंडोशी
4) ऋतुजा लटके – अंधेरी पूर्व
5) वरुण सरदेसाई – वांद्रे पूर्व
6) रमेश कोरगावंकर – भांडुप पश्चिम
7) संजय पोतनीस – कलिना
8) विनोद घोसाळकर किंवा तेजस्वी घोसाळकर – दहिसर
9) भास्कर जाधव – गुहागर
10) कैलास पाटील – धाराशिव
11) उदयसिंह राजपूत – कन्नड
12) राहुल पाटिल – परभणी
13) राजन साळवी – राजापूर
14) वैभव नाईक – कुडाळ
15) नितीन देशमुख- बाळापूर
16) शंकरराव गडाख-नेवासा
17) स्नेहल जगताप – महाड मतदारसंघ
18) सुधाकर बडगुजर – नाशिक पश्चिम
19) अद्वय हिरे – मालेगाव बाह्य
20) नितीन सावंत – कर्जत मतदारसंघ
21) अनिल कदम – निफाड
22) दीपेश म्हात्रे -डोंबिवली
23) सुभाष भोईर – कल्याण ग्रामीण
24) मनोहर भोईर – उरण
25) किशनचंद तनवाणी -छत्रपती संभाजीनगर मध्य
26) राजू शिंदे -छत्रपती संभाजीनगर पश्चिम
27) दिनेश परदेशी- वैजापूर मतदारसंघ
28) कन्नड मतदारसंघ – उदयसिंह राजपूत
29) सुरेश बनकर- सिल्लोड मतदारसंघ –
30) राजन तेली – सावंतवाडी
31) दीपक आबा साळुंखे – सांगोला