जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख | राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेनेने (shivsena) राज्यभर संघटन बांधणीची मोहिम गतिमान केली आहे. यासाठी शिवसेनेचे मंत्री आपापल्या जिल्ह्यात जाऊन शिवसंवाद (Shivsamvad ) बैठकांच्या माध्यमांतून जनता व शिवसैनिकांची संवाद साधताना दिसत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेनेचे ऐकमेव मंत्री असलेले राज्याचे मृदू व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh) यांनी १० सप्टेंबर रोजी जामखेड (Jamkhed visit) तालुक्यात शिवसंवाद बैठका घेतल्या. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसह जनतेशी संवाद साधला. शिवसैनिकांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न त्यांनी केला.गडाखांचा हा बुस्टर डोस जामखेड शिवसेनेला नवसंजीवनी देणारा ठरणार का ? याचीच चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
जामखेड तालुक्यात शिवसेनेचा ऐकेकाळी मोठा दबदबा होता. जामखेड शिवसेनेने तालुक्याला अनेक दिग्गज नेते दिले आहेत. सध्या जामखेडच्या शिवसेनेचे अस्तित्व नगण्य आहे. मागील 25 वर्षे शिवसेना – भाजप युतीचा स्थानिक आमदार राहिल्याने शिवसेनेची वाढ खुंटली. सध्या राज्यात शिवसेना सत्तेत आहे. त्याचा उपयोग करून शिवसेनेचा तालुक्यात अजूनही मोठा विस्तार झालेला नाही. सध्या जामखेड तालुका शिवसेनेची धुरा युवा नेतृत्व असलेल्या संजय काशिद (Sanjay Kashid) यांच्याकडे आहे.
अगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi Government) प्रयोग झाल्यास शिवसेनेला राष्ट्रवादीशी (NCP) समझोता करावा लागेल. त्यातून मिळतील त्या जागा लढवाव्या लागतील मात्र मिळालेल्या जागा जिंकून आणण्यासाठी शिवसेनेला तगडे संघटन उभे करावे लागेल. जागा जिंकून येतील असे उमेदवारही शिवसेनेला अत्तापासून तयार करावे लागतील.
दरम्यान शिवसेना तालुका प्रमुख संजय काशिद व त्यांचे सहकारी नेटाने जामखेड तालुक्यात शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. पण सध्या जामखेड शिवसेनेला आक्रमक भाषण ठोकून जनतेला आकर्षित करणाऱ्या एखाद्या कार्यकर्त्याची गरज आहे. जर असा एखादा कार्यकर्ता शिवसेनेच्या गळाला लावला तर जामखेडमध्ये शिवसेना आणखी सुसाट धावेल.
दरम्यान १० सप्टेंबरला जामखेड तालुक्यातील जवळा, नान्नज, व बावी तसेच अन्य भागात राज्याचे जलसंधारणामंत्री शंकरराव गडाख यांनी शिवसंवाद बैठका घेत शिवसैनिकांमध्ये ऊर्जा भरली. अशीच ताकद गडाख यांनी सातत्याने जामखेडच्या शिवसेनेला दिल्यास अगामी काळात जामखेड शिवसेनेचे चित्र पुर्णपणे बदललेले असेल.
जामखेड तालुक्यात तगडे संघटन उभे करून आपले उपद्रवमूल्य दाखवणे जामखेड शिवसेनेला आता आवश्यक आहे. तरच शिवसेना तालुक्यात जोमात वाढेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जामखेड तालुका शिवसेना अगामी काळात काय रणनिती आखते ? व अंमलबजावणी कशी करते यावर शिवसेनेचे जामखेड (jamkhed Shiv Sena) तालुक्यातील राजकीय यश अवलंबून असणार आहे. असे असले तरी १० सप्टेंबर रोजी राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी शिवसंवाद बैठकीच्या माध्यमांतून जामखेड शिवसेनेला दिलेला बुस्टर डोस शिवसेनेला नवसंजीवनी देणार ठरू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे हे मात्र निश्चित!
मंत्री गडाखांचे राष्ट्रवादीकडून ठिकठिकाणी स्वागत
मृदू व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख शुक्रवारी जामखेड दौऱ्यावर आले होते. या दौर्यात राष्ट्रवादीनेही त्यांचे ठिकठिकाणी स्वागत केले.या माध्यमांतून राष्ट्रवादीने महाविकास आघाडीचा धर्म पाळण्याचा प्रयत्न केला. राज्याच्या राजकारणात पवार व गडाख घराण्यांची मैत्री सर्वश्रूत आहे. ही मैत्री किती घट्ट आहे याचे दर्शन शुक्रवारी रोहित पवारांच्या (MLA Rohit Pawar) मतदारसंघात पहायला मिळाले. राष्ट्रवादीने गडाखांचे स्वागत करत जपलेला मैत्रीचा राजधर्म जामखेडच्या राजकारणात चर्चेचा ठरला.