मुंबई, दि 05 एप्रिल, जामखेड टाईम्स वृत्तसेवा : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ईडीने राऊत यांची आलिशान येथील मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली. या कारवाईमुळे राऊत यांच्या अडचणी वाढल्या आहेत. (ED’s big action: Shiv Sena MP Sanjay Raut’s property in Alibag confiscated from ED)
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या यांच्या मुलीच्या लग्नानंतर ईडीने राऊत यांच्या कुटूंबियांची काही दिवसांपूर्वी चौकशी केली होती. ईडी विरूध्द राऊत हा सामना मध्यंतरी रंगला होता. राऊत यांनी ईडीच्या काही अधिकाऱ्यांविरोधात मोहिम उघडली होती.
त्यातच आता ईडीने राऊत यांच्यावर मोठी कारवाई केली. राऊत यांची आलिबाग येथील मालमत्ता ईडीने जप्त केली. ईडीने केलेल्या कारवाईत दादर येथील एक प्लॅट आणि आलिबाग येथील आठ ठिकाणच्या जागा जप्त करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
प्रविण राऊत यांच्या अटकेनंतर ईडीने ही कारवाई केली आहे.1034 कोटी रूपयांच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्यात ईडीने ही कारवाई केली असे एजन्सीने म्हटले आहे, असे ट्विट ANI वृत्तसंस्थेने केले आहे.
राऊत यांनी कारवाई होताच एकच ट्विट केले आहे. यात राऊत यांनी असत्यमेव जयते अश्या दोनच शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान राऊत यांच्यावरील कारवाईनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडी आणि भाजप या दोन्ही गटाकडून याबाबत काय प्रतिक्रिया येतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.