बंडखोरीनाट्याचा सस्पेन्स वाढला : आजही आम्ही शिवसेनेत, एकनाथ शिंदे गटाचे स्पष्टीकरण

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची आज गुवाहटीत बैठक पार पडली. या बैठकीनंतर आमदार दीपक केसरकर यांनी माध्यमांशी ऑनलाइन संवाद साधला. केसरकर यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर निशाणा साधत या दोन्ही पक्षाविरोधात तक्रारींचा पाढा वाचला.

संजय राऊत हे विधीमंडळाचे सदस्य नाहीत, त्यामुळे ते काय बोलतात याला आम्ही जास्त महत्व देत नाहीत, आम्ही बाळासाहेबांंचे शिवसैनिक आहोत, आम्ही आजही शिवसेनेत आहोत, आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो असं भासवले जात आहे, परंतू परिस्थिती वेगळी आहे असे विधान शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत केले.

आम्ही भाजपसोबत गेल्याच्या चर्चा सुरू आहे. मात्र आमचा गट सध्या कोणत्याही पक्षासोबत नाही, असे केसरकर यावेळी म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी सत्तासंघर्षात एक पाऊल पुढं टाकलं आहे. आपल्या गटाचं नाव आता त्यांनी ठेवलं असून ‘शिवसेना-बाळासाहेब ठाकरे’ असं शिंदे गटाचं नाव ठरल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र आमच्या पक्षाचे नाव शिवसेनाच आहे. आम्ही शिवसैनिक म्हणून काम करणार आहे, असे म्हणत गटाचं नाव ठरल्याच्या चर्चांवर पडदा टाकला आहे.

उद्धव ठाकरे यांनी आम्ही या अगोदरही सांगितले होते. आम्हाला महाविकास आघाडीबरोबर जायचं नाही. आम्ही कोणाच्याही दबावाखाली निर्णय घेतला नाही. आजही आम्ही शिवसेनेचे सदस्य आहोत. बाळासाहेबांचे विचार मांडणारे आम्ही एकत्र आल्याची माहिती दिपक केसरकर यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात सध्या जे दाखवले जाते त्यापेक्षा परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी रस्त्यावर येण्याची गरज नाही. कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन दीपक केसरकर यांनी केले आहे. तसेच परिस्थिती नीट झाल्यावर आम्ही मुंबईत येऊ असे देखील ते या वेळी म्हणाले.

दरम्यान शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या बैठकीआधी शिवसेनेच्या