जामखेड टाइम्स वृत्तसेवा : संसदीय कार्यप्रणालीत कुठलेही सरकार बनवताना बहूमताचा आकडा ज्याच्याकडे तो सत्तेचा धनी ठरतो. शिवसेेनेे बंडाळी झाली.यामुळे महाराष्ट्रात बहूमताचा आकडा ठाकरे सरकारने गमावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले.
खरं तर सरकार कोसळल्यानंतर देशभर चर्चा होऊ लागलीय ती उध्दव ठाकरे यांची. एखाद्या मुख्यमंत्र्यांने राजीनामा दिल्यानंतर जनता उत्स्फूर्तपणे त्या मुख्यमंत्र्यांच्या कामाविषयी गुणगान गात असल्याचे पहिल्यांदाच घडत होते. अनेकांना आश्रू अनावर झाले. पक्षांच्या – धर्माच्या – विचारांच्या भिंती तोडून सोशल मिडीयावर उध्दव ठाकरे यांच्याविषयी लोकं भरभरून व्यक्त होत आहेत.
ठाकरे यांच्या राजीनाम्याने एका गटाला आनंद झाला हेही नमुद करण्यासारखं आहे. पण ठाकरे यांनी भारतीय राजकारणात नवा आदर्श घालून दिला. एकिकडे सत्तेसाठी राजकारणी वाट्टेल त्या थराला जात असताना उध्दव ठाकरे यांनी कुठलीही आदळआपट न करता सहजपणे सत्ता सोडली. या कृतीने अनेकांची मने जिंकली.
उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोशल मिडीयावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. त्यातीलच काही मोजक्या प्रतिक्रिया