Sanjay Raut Press Conference Mumbai | संजय राऊत कडाडले : शिवलेले कोट 2024 साली भांडीवाल्याला देण्यासाठी तयार रहा
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Sanjay Raut Press Conference Mumbai : महाराष्ट्राच्या बाहेर एक खासदार काय निवडून आला, आता शिवसेनेच्या (Shiv Sena) नेत्यांना पंतप्रधानपदाची स्वप्न पडू लागली आहेत, अशी टीका भाजपकडून होऊ लागलीय या टिकेवरून आक्रमक झालेल्या खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद (Mumbai Press Conference) घेत भाजपला (BJP) सडेतोड प्रत्युत्तर दिले.
संजय राऊत म्हणाले, देशात ठिकठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. शिवसेनेचा खासदार दादरा नगर हवेलीत (Dadra Nagar Haweli) निवडून आला याचा आम्हाला नक्कीच आनंद आहे. पण भाजपाला इतकं महत्त्वाचं वाटत नसेल तर मग केंद्रीय मंत्र्यांची फौज प्रचारात का उतरवली होती? रेल्वेमंत्री सहा दिवस तळ ठोकून होते. स्मृती इराणी होत्या आणि गुजरात सरकारचे मंत्रीही होते. तरीही शिवसेना सर्वांना पुरून उरली आणि मोठ्या फरकाने विजयी झाली.
पंतप्रधानपदाच्या स्वप्नाची भाषा करणाऱ्यांनी शिवलेले कोट २०२४ साली भांडीवाल्याला देण्यासाठी तयार राहावं”, असं खोचक टोला संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांना लगावला आहे. ( Sanjay Raut Press Conference Mumbai, Sanjay Raut’s strong attack on BJP)
राज्यात महाविकास आघाडीविरोधात वातावरण असल्याचं एका पत्रकारानं विचारताच राऊतांनी तुमची माहिती चुकतेय. तुम्ही नीट जाणून घ्या राज्यात आज विरोधी पक्षाच्या विरोधातच वातावरण आहे. “एक गोष्ट अत्यंत चमत्कारीक आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात असं कधीच झालेलं नाही. राज्यात आज सरकारविरोधात नव्हे, तर विरोधी पक्षाच्याच विरोधात वातावरण आहे. हे राज्यात पहिल्यांदाच पाहायला मिळतंय”, असं संजय राऊत म्हणाले.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं पेट्रोलच्या दरात ५ रुपये आणि डिझेलच्या दरात १० रुपयांची कपात करुन जनतेला दिवाळी भेट दिली. पेट्रोल आणि डिझेलचे दर शंभरी पार गेल्यामुळे भाजपा सरकारवर टीका केली जात असताना केंद्रानं इंधन दरात कपात करत सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी मात्र मोदी सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. देशातील पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवामुळेच केंद्र सरकारनं पेट्रोल, डिझेलचे दर कमी केले आहेत. मग ५० रुपयांनी पेट्रोल स्वस्त करायचं असेल तर आपल्याला आता संपूर्ण देशभर भाजपाचा पराभव करावा लागेल, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला आहे.