ShivSena Dussehra rally 2021 | ठरलं ! शिवसेनेचा मोठा निर्णय : दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार नाही पण……
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : ShivSena Dussehra rally 2021 | शिवसेनेचा दसरा मेळावा म्हटलं की देशभरातील शिवसैनिकांसाठी ऊर्जादायी ठरतं असतो. कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात होऊ शकलेला नाही. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यंदा दसरा मेळावा होणार असल्याचे जाहिर केले आहे.(MP Sanjay Raut announced that Dussehra rally will be held) परंतु यंदाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर होणार नाही. ShivSena big decision This years ShivSena Dussehra rally will be held at Shanmukhanand Hall in Matunga)
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कच्या मैदानात होऊ शकलेला नाही. यंदाचा दसरा मेळावा 100% टक्के होणारच अशी स्पष्ट भूमिका खासदार संजय राऊत यांनी जाहिर केली आहे.शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे देशाचे लक्ष लागुन राहिलेले असते. या मेळाव्यात व्यक्त होणारी मते राजकीय पटावर परिणाम करणारी ठरत असतात.
यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) हे मार्गदर्शन करणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सभागृहाच्या क्षमतेच्या 50% टक्केच उपस्थिती मेळाव्यात असणार आहे. या मेळाव्यात शिवसेनेचे मंत्री,सर्व वरिष्ठ नेते, उपनेते, खासदार आमदार उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून राज्यात राजकारणात अनेक महत्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. भाजप विरूध्द महाविकास आघाडी, भाजप विरूध्द शिवसेना, राणे विरूध्द ठाकरे, फडणवीस विरूध्द ठाकरे, भाजप विरूध्द राष्ट्रवादी असा संघर्ष सातत्याने उफाळून येत आहे. याच संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या खास ‘ठाकरे शैलीत’ कुणा कुणाचा ‘गेम’ करणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
web titel : ShivSena Dussehra rally 2021 | ShivSena big decision ShivSena Dussehra rally 2021 will be held at Shanmukhanand Hall in Matunga