भाजप प्रवेशावर शिवसेना आमदार तानाजी सावंत स्पष्टच बोलले | Shiv Sena MLA Tanaji Sawant spoke clearly on BJP entry

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । शिवसेनेचे उपनेते तथा भूम परांडा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत (ShivSena MLA Tanaji Sawant) भाजपात प्रवेश (BJP) करणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. खासदार संभाजीराजे (MP Chatrpati Sambhaji raje) यांनी सावंत यांची भेट घेतल्यानंतर या चर्चेला अधिक बळ मिळाले. आता या सर्व प्रकरणावर मौन सोडत आमदार सावंत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Pune Press Conference)

आपण भाजपात जाणार असल्याच्या चर्चा या अफवा आहेत. माझ्या विरोधात कुणीतरी कुभांड रचलं आहे. मी माझ्या राजकीय कारकीर्दीत कधीच पक्षाविरोधात बोललेलो नाही. विधानसभा निवडणुकीनंतर जर मी पक्षाविरोधात एक जरी वक्तव्य केलं असेल तर ते दाखवा, मी आमदारकीचा राजीनामा देऊन टाकतो असे थेट अव्हानच आमदार तानाजी सावंत यांनी दिले. ( Shiv Sena MLA Tanaji Sawant spoke clearly on BJP entry)

आमदार तानाजी सावंत पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी भाजप प्रवेशासंबंधी विचारलेल्या प्रश्नांवर आपली भूमिका मांडली, सावंत पुढे म्हणाले की,  मी शिवसेना सोडणार आणि भाजपात जाणार ही एक राजकीय चर्चा आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी मी सध्या पार पाडत आहे.शिवसेनेत आदेश चालतो, जबाबदारी द्यायची की नाही हे पक्ष ठरवेल असेही सावंत म्हणाले.

मी शिवसेना सोडणार नाही, कोणी काहीही वावड्या उठवो मी पक्षातच आहे असेही सावंत यांनी स्पष्ट केले. पुण्यात सावंत यांनी लाल महाल परिसरात पत्रकारांशी संवाद साधत भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम देत आपण शिवसेनेत असल्याचे स्पष्ट केले.