मंत्री एकनाथ शिंदेंबाबत शिवसेनेचा मोठा निर्णय | Shiv Sena’s big decision regarding Minister Eknath Shinde
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर राज्याच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली होती. शिवसेनेने आता कडक धोरण अवलंबवत मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक मोठा निर्णय घेतल्याची बातमी आता समोर आली आहे. (Shiv Sena’s big decision regarding Minister Eknath Shinde)
मंत्री एकनाथ शिंदे शिवसेना नाराज असल्याची चर्चा काही दिवसांपासून होती दरम्यान विधान परिषदेचे निकाल हाती आल्यानंतर मंत्री शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांसह सुरतला दाखल झाले होते, शिंदे यांच्यासोबत 12 आमदार असल्याचे सांगितले जात होते त्यानंतर दुपारी शिंदे यांच्यासोबत 26 आमदार असल्याचा दावा कायम मीडिया रिपोर्ट म्हणून आला होता.
दरम्यान नाराज एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर आणि काही नेते गुजरातला गेल्याची माहिती समोर आली होती. शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रस्ताव पाठवला होता तो प्रस्ताव ठाकरे यांनी धुडकावला असल्याची माहिती समोर येत आहे. ठाकरे यांनी शिंदे यांचा प्रस्ताव नाकारून पक्षात कुणीही बंड करू शकणार नाही.कुणाही पुढे पक्ष झुकणार नाही हे दाखवून दिलं आहे.
अहमदनगर जिल्ह्यात राजकीय भूकंप, भाजपच्या नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश !
शिंदे यांचा प्रस्ताव नाकारल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. एकनाथ शिंदे यांची विधीमंडळ नेतेपदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.एकनाथ शिंदे यांच्या ऐवजी अजय चौधरी यांच्याकडे विधीमंडळ नेते पदाची धुरा देण्यात आली आहे.
अजय चौधरी हे कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांच्या माध्यमातून पक्षावर ठाकरे कुटुंबाचीच मांड कायम राहावी यासाठी उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. चौधरी यांची गटनेतपदी नियुक्ती करून उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्या कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
आमदार राम शिंदे उद्या कर्जत – जामखेडमध्ये होणार दाखल, असा असेल दौरा
एकनाथ शिंदे हे कालपासून नॉट रिचेबल होते. दुपारी विधान परिषदेची निवडणकू पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे हे समर्थक आमदारांना घेऊन गुजरातच्या दिशेने गेले. पालघर सोडल्यानंतर त्यांना लगेचच गुजरात पोलिसांनी संरक्षण दिलं.
म्हणजेच निवडणुकीनंतर गुजरातला जाण्याचं शिंदे यांचं आधीच ठरलं होतं. त्याचं प्लानिंगही झालं होतं. त्यानंतर शिंदे आणि त्यांचे समर्थक सुरतच्या ला मेरेडियन हॉटेलमध्ये थांबले. तोपर्यंत शिंदे यांनी बंड केल्याचं कुणाला कानोकान खबर नव्हती.
मोठी बातमी : करुणा शर्मांना पुण्यात अटक
मात्र, शिवसेनेचे दोन उमेदवार निवडून आल्यानंतरही शिवसेनेच्या नेत्यांनी जल्लोष केला नाही. शिवसेनेकडून कोणीही प्रतिक्रिया देण्यासाठी पुढे आलं नाही. त्यामुळे शिवसेनेत आलबेल नसल्याचं जाणवत होतं.
शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांना पक्षात फूट पडत असल्याची कुणकुण लागली होती. त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना बोलूनही दाखवलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावरही त्यांनी टाकलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्रीही सावध झाले होते. मुख्यमंत्र्यांनी तातडीने लगेचच सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिले होते.
मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत ते समर्थक आमदार कोण ? वाचा आमदारांंची यादी
दरम्यान, शिवसेनेच्या गटनेतपदावरून शिंदे यांना डच्चू देण्यात आला आहे. त्याऐवजी अजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, शिवसेनेने याबाबतची अधिकृत घोषणा केली नाही. या आधी गटनेतेपदी आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्याची चर्चा सुरू होती. मात्र, अजय चौधरी हे कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांची आमदार म्हणून दुसरी टर्म आहे. त्यामुळे त्यांच्याकडे गटनेतेपदाची ही धुरा देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात राजकीय भूकंप, शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे 11 समर्थक आमदारांसह गुजरातला, शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर?