जामखेड टाइम्स वृत्तसेवा : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत 6 प्रस्ताव ठेवण्यात आले होते. त्यावर एकमताने निर्णय घेण्यात आला. एकुणच शिवसेना बंडखोरांविरोधात अधिक आक्रमक झाल्याचे आता दिसत आहे.
आज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसत होते. यावेळी त्यांनी बंडखोरांना उद्देशून म्हटले आहे की, हिम्मत असेल तर स्वता:च्या बापाच्या नावावर मते मागा, मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाशी प्रतारणा आजतादायत केली नाही. इथून पुढेही करणार नाही असे ठणकावून सांगितले. तसेच एकनाथ शिंदेंचं बंड हा शिवसेना संपवण्यासाठी भाजपचा डाव असल्याचे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर थेट आरोप केलाय.
चोंडीसाठी 7 कोटी तर मतदारसंघातील इतर देवस्थानांसाठी 1 कोटी 65 लाखांचा निधी मंजूर !
शिवसेनेच्या (Shivsena) कार्यकारिणीच्या बैठकीत एकूण 6 प्रस्ताव ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांचं नेतेपद काढा, या मागणीमुळे शिंदेंची हकालपट्टी होण्याची शक्यता आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पाठिशी पक्ष उभा असेल, असाही प्रस्ताव यावेळी मांडण्यात आला. बंडखोरांवर कारवाईचे सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहेत.
शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना निलंबनाची नोटीस, सदस्यत्व धोक्यात?
http://jamkhedtimes.com/maharashtra/notice-of-suspension-to-16-rebel-mlas-of-shiv-sena/
बेईमानी करणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे
मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे बेईमानी करण्याऱ्यांवर कारवाईचे सर्व अधिकार असणार आहेत. बेईमानी करणाऱ्यांवर शिवसेना पक्षप्रमुख थेट कारवाई करू शकतात. बंडखोरांवर कारवाईचे थेट आणि सर्व अधिकार ठाकरेंकडे असणार आहे
शिवसेना ही बाळासाहेबांचीच आहे आणि राहिल
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. ठाकरेंची शिवसेना आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा वेगळा गट, या युद्धात शिवसेनेच्या कार्यकारिणीत मोठा निर्णय घेण्यात आला. तसाही प्रस्तावही मांडण्यात आला. शिवसेना ही बाळासाहेबांचीच असणार आणि राहणार, असा प्रस्ताव यावेळी मांडण्यात आलाय.
पालिका निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकणार
शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार, असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय. यावेळी महापलिकेसाठी तयार रहा, असंही सांगण्यात आलंय.
‘आधी नाथ होते आता दास झाले’
कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केलाय. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावानं मत मागा. आधी नाथ होते आता बाप झाले, अशी टीका देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावलाय.
शिवसेनेच्या कार्यकारणीतील प्रस्ताव
- शिवसेना ही बाळासाहेबांचीच आहे आणि राहिल
- एकनाथ शिंदे यांचं नेतेपद काढा
- शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे
- मराठी अस्मितेशी कधीच प्रतारणा करणार नाही
- कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी चांगलं काम केले यासाठी उद्धव ठाकरेंच्या अभिनंदनाचा प्रस्ताव
- आगामी पालिका निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकणार