जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांचा चांगला समाचार घेतला आहे. (Uddhav Thackeray told rebel MLAs)
Electricity substation | शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांच्या गावाला रोहित पवारांकडून अनोखी भेट !
यावेळी बोलताना शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, मातोश्रीवर सन्मानाने बोलवावं असे बोलणाऱ्यांना मातोश्री, आदित्य, उद्धव यांच्याबाबत प्रेम आहे, याबद्दल धन्यवाद, पण हे जे प्रेम दाखवता, तेच प्रेम दोन अडीच वर्ष कुठे होतं, याच घरावर जेव्हा अश्लाघ्य टीका केली जात होती, तेव्हा त्यांच्याविरोधात दातखिळ बसली होती का? असा थेट सवाल ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना विचारला आहे.
जामखेड पोलिसांनी शोधले अडीच लाखांचे मोबाईल
ठाकरे पुढे म्हणाले की, विकृत शब्दांत ज्यांनी आमच्यावर टीका केली, त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसला आहात. हे प्रेम खरं आहे की खोटं आहे. हेही जनतेला कळू द्या असे म्हणत उध्दव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांचा समाचार घेतला.
बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात, निष्ठा यात्रेची केेली घोषणा !
माझ्या मुलांना आयुष्यातून उठवण्यापर्यंत ज्यांचे प्रयत्न चालले, त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसला आहात, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना सुनावलं.आदित्य ठाकरेंवर भाजपने गेल्या अडीच वर्षांत केलेल्या टीकेवरुन उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांचा खरपूस समाचार घेतला. तसंच बंडखोर आमदारांना थेट समोरा समोर येऊन बोलण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केली.
मोठी बातमी : आमदार राम शिंदेंसह दहा जणांचा शपथविधी संपन्न
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुशांत सिंह प्रकरणावरुन आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. नारायण राणेंनी केलेले सनसनाटी आरोप तेव्हा प्रचंड चर्चेत आले होते. त्यावेळी आदित्य ठाकरेंवर करण्यात आलेल्या आरोपांवर बंडखोर आमदारांपैकी कुणी बोललं होतं का, असा सवालच अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलाय. दिशा सालीयन आत्महत्या प्रकरणावरुनही आदित्य ठाकरेंवर नारायण राणेंनी टीका केली होती. हा वाद प्रचंड चर्चेत आला होता.
दरम्यान, यावेळी शिवसेना ही आपलीच असल्याचा पुनरुच्चारही उद्धव ठाकरेंनी केली. साध्या साध्या माणसांना शिवसेनेनं मोठं केलं, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. तसंच अडीच वर्षांपूर्वी हे सगळं झालं असतं, तर ते सन्मानाने झालं असतं, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलंय.