जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यात आठ दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार ( mahavikas aghadi government) गॅसवर आहे. उद्या बहुमत चाचणीत ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारचा फैसला होणार आहे. परंतू शिवसेना (shiv sena) सुप्रीम कोर्टात गेल्याने कोर्टाचा काय निर्णय येतो त्यावर बरीच गणिते अवलंबून आहेत. उद्या ठाकरे सरकारचं काय होणार ? याचीच सर्वांना उत्सुकता लागली आहे. तत्पूर्वी आकड्यांचा खेळ नेमका कोणाच्या बाजूने आहे ? कोणाचा गेम होणार ? यावर एक नजर टाकूयात.
महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आहे, त्यामुळे सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे असे पत्र भाजपने राज्यपालांना मंगळवारी रात्री दिले होते. त्यानुसार आज राज्यपालांनी सरकारला बहुमत सिध्द करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेले शिवसेना विरूद्ध शिंदेसेना ही लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे.
उद्या ठाकरे सरकारला बहुमत सिध्द करण्यास सांगण्यात आले आहे. आता खऱ्या अर्थाने नंबर गेम सुरू होणार आहे. शिवसेनेकडे 55 आमदार आहेत त्यातील 39 जणांनी बंडखोरी केली आहे. यात 8 मंत्र्यांचा समावेश आहे. हे सर्व आमदार आठ दिवसांपासून गुवाहाटीत तळ ठोकून आहेत. याशिवाय प्रहारचे 2 आणि इतर 7 आमदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.
http://jamkhedtimes.com/politics/bjp-news/how-did-you-get-the-tickets-for-the-legislative-council-read-the-whole-story-in-the-words-of-ram-shinde-aamdar-ram-shinde-news/
राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे आमदार तुरुंगात आहेत तसेच राष्ट्रवादीचे अजित पवार आणि छगन भुजबळ हे कोरोना बाधित आहेत. मलिक आणि देशमुख यांनी कोर्टात धाव घेतली आहे. या सर्वांना मतदानास परवानगी मिळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दुसरीकडे शिवसेनेने 16 आमदारांना अपात्रं ठरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शिंदे गटाने तांत्रिक कारणं पुढे देत शिवसेनेची कृती चुकीची आहे असं म्हटलं असलं तरी बंडखोरांसाठी वाटतो तितका मार्ग सोपा राहिलेला नाही. हे प्रकरण कोर्टात असल्याने कोर्ट काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिंदे गटाकडे शिवसेनेचे 39 आमदार आहेत. म्हणजे शिंदे गटाकडे दोन तृतियांश मते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायदा लागू होत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे वेगळा गट स्थापन करून हे लोक भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
http://jamkhedtimes.com/politics/shivsena/shiv-sena-runs-in-supreme-court-against-governors-order-hearing-to-be-held-today/
महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण 288 आमदार आहेत. त्यापैकी शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्याने हा आकडा 287 झाला आहे. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी 144 आमदारांची गरज आहे. राष्ट्रवादीकडे 53 आमदार आहेत. काँग्रेसकडे 44 आमदार आहेत. शिवसेनेकडे 55 आमदार आहेत. तिन्ही पक्षाच्या एकूण आमदारांची संख्या 152 होते.
http://jamkhedtimes.com/politics/bjp-news/my-family-my-responsibility-everything-else-guwahati-bjp-mla-ram-shindes-strong-target-on-the-chief-minister-uddhav-thackeray/
त्याशिवाय महाविकास आघाडीला बच्चू कडू यांच्या दोन आमदारांनी आणि इतर अपक्षांनी पाठिंबा दिला आहे. म्हणजे आघाडीला बविआच्या 3, सपाच्या दोन, पीजेपीच्या दोन आणि पीडब्लूपीच्या एका आणि 8 अपक्षांचा पाठिंबा आहे.मात्र, आता खेळ बिघडला आहे. कारण शिवसेनेच्या 39 आमदारांनी बंड केलं आहे. तर आघाडीच्या सर्व अपक्षांनी आणि प्रहारच्या दोन आमदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेकडे केवळ 16 आमदार उरले आहेत.
http://jamkhedtimes.com/maharashtra/todays-biggest-news-in-politics-of-maharashtra-maharashtra-bjp-demands-to-prove-majority/
दुसरीकडे भाजपकडे 106 आमदार आहेत. त्यांना सात अपक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपचा आकडा 113 झाला आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी 144 आमदार हवे आहेत. शिंदे गटाकडे 39 आमदार आहेत. हे आमदार उद्या मतदानात सहभागी नाही झाल्यास बहुमतासाठीचा आकडा 121 होईल. अशावेळी भाजपकडे 113 आमदार आहेत. त्यांच्यासोबत 16 अपक्ष आणि इतर आमदारही आहेत. त्यामुळे भाजपचं संख्याबळ 129 वर पोहोचेल. तर 113 आमदाराच हाती असल्याने आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करता येणार नाही.