जामखेड टाईम्स वृत्तसेवा । Karuna Munde’s Big Announcement। गेल्या काही दिवसांपासून करूणा मुंडे ह्या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंविरोधात सातत्याने आरोप करत आहेत. मध्यंतरी परळी दौऱ्यात मोठा राडा झाला होता. करूणा मुंडे यांना एका प्रकरणात अटक झाली होती. सुटकेनंतर पुन्हा करूणा मुंडे ह्या धनंजय मुंडेंविरोधात आक्रमक झाल्याचे दिसत आहे. अभी तो पिक्चर बाकी है म्हणत करूणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंविरोधात दंड थोपटले. (Karuna Munde’s big announcement)
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात अगामी काळात परळीतून आमदारकीची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा शिवशक्ती सेना पक्षाच्या संस्थापक करूणा मुंडे यांनी आज पुण्यात केली. वेळ आली तर परळीत नवरा विरूध्द बायको अशी लढत होईल असे म्हणत मुंडे यांनी निवडणूक लढविण्याचे संकेत दिले. (Karuna Munde’s Big Announcement)
करूणा मुंडे यावेळी बोलताना म्हणाल्या, कार्यकर्ता आगे बढो, करूणा धनंजय मुंडे त्यांच्यासोबत आहे अशी माझी घोषणा आहे. मी माझ्या लोकांची नेता झाली आहे. मी अत्ता निवडणूक लढवण्याचा विचार केलेला नाही परंतू कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याचा आग्रह केला आणि माझ्या आयुष्यात निवडणूक लढावी अशी परिस्थिती आली तर मी परळीतून धनंजय मुंडेंच्या विरोधात निवडणूक लढवेन अशी घोषणा त्यांनी केली. (Karuna Munde’s Big Announcement)
करूणा मुंडे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेत प्रवेश केला. संघटनेने त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मंत्री धनंजय मुंडेंविरोधात पुन्हा एकदा दंड थोपटले.
करूणा मुंडे म्हणाल्या, धनंजय मुंडेंपेक्षा राज्यात करुणा मुंडेंच्याच नावाची चर्चा आहे. महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार सुरु आहे. कुठेही न्याय मिळत नाहीये. कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारासाठी आंदोलने करावी लागत आहेत. हे राजकारण संपवण्यासाठी मी एक मोहिम सुरु केली आहे. घराणेशाहीचे राजकारण मला संपवायचे आहे. अन्यायाविरुद्ध मी मोहिम सुरु केली आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून मी एक एक कार्यकर्त्यांना जोडणार आहे.
माझ्या पतीला मी सांगायचे की तुमच्यावर इतिहास रचला जाईल. पण मला हे माहिती नव्हतं की माझ्या पतीवर नाही तर माझ्यावर इतिहास रचला जाणार आहे. मी महाराष्ट्रातील पहिली महिला आहे जिने आपल्या पतीविरोधात आवाज उठवला आहे. मंत्री असणाऱ्या पतीने दोन मुलांची आई असणाऱ्या मला १६ दिवस तुरुंगात पाठवले.
महाराष्ट्रात राजकीय पक्ष काढणारी मी पहिली महिला आहे. मी घराणेशाहीच्या घाणेरडे राजकारणाविरोधात आंदोलन सुरु केले आहे. जास्तीत जास्त महिलांना होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला हवा. मी जे करत आहे त्यासाठी अनेक मंत्र्यांच्या पत्नीचे मला फोन आले आहेत. त्यांनी आमच्यात हिंमत नाही पण आम्ही तुम्हाला मागून पाठिंबा देऊ शकतो असे सांगितले. मी महिलांना एकच सांगेल की या मोहिमेत अधिकाधिक महिलांनी सहभागी व्हावे,” असे करुणा मुंडे म्हणाल्या.
माझ्यावर न्यायालयाने आमच्या वैयक्तिक प्रकरणात काहीही भाष्य करण्यास निर्बंध लावले आहेत. त्यामुळे मी सध्या बोलत नाहीये. मात्र, हे निर्बंध उठवल्यानंतर मी माध्यमांना जाहीर न केलेल्या अनेक गोष्टी सांगणार आहे. अभी तो पिक्चर बाकी है,” असं म्हणत करूणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.