केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात ४३ नव्या चेहऱ्यांचा समावेश पहा कोणाचा झाला समावेश

आज सायंकाळी ६ वाजता झाला नव्या मंत्र्यांचा शपथविधी

दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात ४३ नव्या चेहऱ्यांचा समावेश असणार आहे. तर जुन्या १२ मंत्र्यांना डच्चू मिळाला आहे. आज सायंकाळी ६ वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. नव्या मंत्र्यांमध्ये महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे , डॉ भारती पवार, कपिल पाटील व भागवत कराड यांचा समावेश असणार आहे . बीडच्या खासदार डॉ प्रितम मुंढे व अहमदनगरचे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळवता आहे नाही. विशेषतः डॉ प्रितम मुंढे यांचा समावेश होईल अशी जोरदार चर्चा होती परंतु मुंढे यांच्या ऐवजी कराड यांना पक्षाने संधी देत मुंढे गटाला मोठा धक्का दिला आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

संभाव्य ४३ नव्या मंत्र्यांची नावे खालील प्रमाणे

केंद्रीय मंत्री मंडळात, नारायण राणे, कपिल पाटील, डॉ. भागवत कराड, डॉ. भारती पवार, डॉ. राजकुमार सिंह, डॉ. एल. मुरगन, निसित प्रमाणिक, राजीव चंद्रशेखर, शोभा करंडलाजे, भानूप्रताप सिंग वर्मा, दर्शना विक्रम जरदोष, मीनाक्षी लेखी, सर्बानंद सोनोवाल, डॉ. विरेंद्र कुमार, ज्योतिरादित्य सिंधिया,रामचंद्र प्रसाद सिंग, अश्विनी वैष्णव, पशुपती कुमार पारस, किरेन रिजीजू, राजकुमार सिंह, हरदीप सिंह पुरी, मनसुख मंडाविया, भुपेन्द्र यादव, पुरुषोत्तम रुपाला, जी. किशन रेड्डी, अनुराग सिंह ठाकूर, अनुप्रिया सिंह पटेल, डॉ. सत्यपाल सिंह बघेल, अनपुर्णा देवी, ए. नारायण स्वामी, कौशल किशोर, अजय भट्ट, बी. एल. वर्मा, अजय कुमार, चौहान देवूसिंह, भागवत खुपा, प्रतिमा भौमिक, डॉ. सुभाष सरकार, बिस्वेश्वर तडू, शंतनु ठाकूर, डॉ. मुंजपारा महेंद्रभाई, जॉन बरला, असे या 43 नेत्यांचा मंत्रीमंडळात समावेश झाला आहे.

शपथविधीचा संपूर्ण कार्यक्रम पाहण्यासाठी क्लिक करा