Vidhan Sabha Nivadnuk 2024 maharashtra : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ४१ उमेदवार निश्चित, संभाव्य यादी आली समोर, कोण कुठल्या मतदारसंघात लढणार ? वाचा सविस्तर

Vidhan Sabha Nivadnuk 2024 Maharashtra : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरूवात सोमवारपासून होणार आहे. अजूनही मोठ्या राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. उमेदवार यादी निश्चित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून बैठकांचा सिलसिला सुरू आहे. काही छोट्या राजकीय पक्षांनी आपले काही उमेदवार जाहीर केले आहेत. मोठ्या पक्षांकडून तिकीट मिळण्याची शक्यता धुसर झाल्याने काही बड्या नेत्यांनी पक्षांतराचा मार्ग निवडला आहे. यामुळे निवडणुकीचे अनेक ठिकाणी समीकरणे बदलताना दिसत आहेत. (NCP AP Candidate List)

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024,ncp ap candidate list, 41 candidates of Ajit Pawar's NCP party are confirmed, the possible list has come out, who will contest in which constituency? Read in detail,

ऐन दिवाळीत (Diwali 2024) होणाऱ्या विधानसभा निवडणूकीच्या या राजकीय युध्दात कोण बाजी मारणार ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात तगडे उमेदवार उतरवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली. महाराष्ट्रात महायुती विरोधात महाविकास आघाडी असा थेट सामना आहे, परंतू तिसरी आघाडीही आकारास येऊ लागली आहे. याशिवाय राष्ट्रीय समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी, AIMIM हे पक्ष स्वबळावर रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे.

महायुती व महाविकास आघाडीतील जागा वाटप अंतिम टप्प्यात आले आहे, आज संध्याकाळी किंवा उद्या दुपारी दोन्ही गटांचे उमेदवारांची अधिकृत घोषणा होऊ शकते.

दरम्यान अजित पवार अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ४१ संभाव्य उमेदवारी समोर आली आहे. यामध्ये अजित पवार बारामतीतून, छगन भुजबळ येवला, धनंजय मुंडे परळी, आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील, कागलमधून हसन मुश्रीफ यांच्यासह ४१ जणांचा समावेश आहे.

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे संभाव्य उमेदवार खालील प्रमाणे

बारामती – अजित पवार

येवला- छगन भुजबळ

कागल- हसन मुश्रीफ

परळी- धनंजय मुंडे

दिंडोरी- नरहरी झिरवळ

अमळनेर – अनिल पाटील

तुमसर – राजू कारेमोरे

अर्जुनी मोरगाव – मनोहर चंद्रीकापुरे

अहेरी- धर्मारावबाबा आत्राम

पुसद- इंद्रनील नाईक

वसमत- चंद्रकांत नवघरे

कळवण- नितीन पवार

सिन्नर- माणिकराव कोकाटे

निफाड- दिलीप बनकर

देवळाली- सरोज अहिरे

शहापूर- दौलत दरोडा

श्रीवर्धन – अदिती तटकरे

उदगीर- संजय बनसोडे

जुन्नर- अतुल बेनके

आंबेगाव- दिलीप वळसे पाटील

खेड, आळंदी- दिलीप मोहिते

इंदापूर- दत्तात्रय भरणे

मोहोळ- यशवंत माने

मावळ- सुनील शेळके

वाई- मकरंद पाटील

चिपळूण- शेखर निकम

पिंपरी- अण्णा बनसोडे

वडगाव शेरी- सुनील टिंगरे

चंदगड- राजेश पाटील

हडपसर- चेतन तुपे

अकोले- किरण लहामटे

करमाळा- संजय शिंदे

मोर्शी- देवेंद्र भुयार

कोपरगाव- आशुतोष काळे

अहमदनगर शहर- संग्राम जगताप

माजलगाव- जयसिंह सोळंके

अहमदपूर- बाबासाहेब पाटील

अणुशक्तीनगर- सना मलिक

शिवाजीनगर मानखुर्द- नवाब मलिक

अमरावती शहर- सुलभा खोडके

इगतपुरी- हिरामण खोसकर