Karjat MIDC : कर्जत एमआयडीसीचे भूमिपूजन कधी होणार? आमदार प्रा राम शिंदेंची मोठी घोषणा, राम शिंदे यांच्या मास्टरस्ट्रोकमुळे विरोधकांचे वस्त्रहरण !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। Karjat Jamkhed News : इतक्या कमी कालावधीत कर्जत एमआयडीसी मंजूर झाली हेच विरोधकांच्या पचनी पडलेले नाही. त्यातही लोकांनीच एमआयडीसाठीची (Karjat MIDC) जागा निवडलेली आहे.अवर्षण प्रवण भागातील जनतेसाठी हा दूरगामी परिणाम करणारा निर्णय आहे. त्यामुळे विरोधक सैरभैर झाले आहेत.त्यांना फक्त व्यवहार कळतो. कोणाचे तरी आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी जनतेला वाऱ्यावर सोडायचे विरोधकांचे धोरण आहे. मविआ सत्ताकाळात कोणत्याही प्रश्नांची सोडवणूक विरोधकांकडून झाली नाही. त्यामुळे ते उद्विग्न अवस्थेत असून बिनबुडाचे आरोप करण्यात धन्यता मानत आहेत, असे म्हणत आमदार प्रा.राम शिंदे यांनी रोहित पवारांवर जोरदार हल्ला चढवला. (Ram Shinde vs Rohit Pawar)
कोंभळी, रवळगाव, थेरगाव भागात नियोजित कर्जत एमआयडीसी होणार आहे. एमआयडीसीला उद्योग विभागाच्या उच्चाधिकारी समितीच्या बैठकीत तत्वता: मान्यता मिळाली आहे. आमदार प्रा राम शिंदे यांनी सरकार दरबारी हाती घेतलेला पाठपुरावा यशस्वी ठरला. महायुतीत सरकारने कर्जत तालुक्यातील (Karjat Taluka) जनतेची स्वप्नपूर्ती करण्यासाठी मोठे पाऊल उचलले. एमआयडीसीचा प्रश्न वेगाने मार्गी लागत असल्यामुळे कर्जत तालुक्यातील जनतेत आनंदाचे वातावरण आहे.
मिरजगाव (Mirajgaon) भागात एमआयडीसी होणार असल्यामुळे या भागातील नागरिकांनी 26 रोजी आमदार प्रा राम शिंदे (Ram Shinde news) यांना लाडू भरवत आनंदोत्सव साजरा केला. एमआयडीसी मंजुर केल्याबद्दल नागरिकांनी आमदार प्रा शिंदे यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना आमदार प्रा शिंदे यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला.(karjat MIDC Latest news today)
मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री, पालकमंत्री यांच्या उपस्थितीत होणार कर्जत MIDC चे भूमिपूजन
आमदार राम शिंदेंना उद्योगातील काही समजत नाही, आम्ही उद्योग चालवतो, आम्हाला माहितीये उद्योग कसे आणायचे, त्यांनी गुऱ्हाळ तरी चालू केले आहे का? एमआयडीसी मीच करणार अशी वल्गना रोहित पवार करत होते. एमआयडीसी संदर्भात आमदारांचे बगल बच्चे माझ्यावर सातत्याने टिका करत होते. परंतु त्यांच्या कोणत्याही टिकेला उत्तर दिले नाही. एमआयडीसी मंजुरीसाठी आपला पाठपुरावा सुरू ठेवला. अडीच महिन्याच्या कालावधीत आपण एमआयडीसी आणून दाखवली, असे शिंदे म्हणाले.
आमदार राम शिंदेंच्या मास्टरस्ट्रोकमुळे विरोधकांचे वस्त्रहरण
ते म्हणायचे 500 एकराच्या आत एमआयडीसी झाली तर रस्त्यावर उतरू पण आपण 1200 एकरच्या एमआयडीसीला तत्वतः मान्यता मिळवली आहे. येत्या जूनमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जत एमआयडीसीचे भूमिपूजन करू, अशी घोषणा आमदार प्रा.राम शिंदे यांनी केली. आमदार राम शिंदे यांच्या या मास्टरस्ट्रोकमुळे विरोधकांचे पुरते वस्त्रहरण झाले आहे. (Ram Shinde karjat MIDC Latest news today)
कर्जत बंदचे राजकारण करणाऱ्यांना फटकारले
औद्योगिक वसाहतीचा सदोष प्रस्ताव शासनाने नाकारला तरी कर्जत बंद, शासनाने कोंभळी येथील एमआयडीसीच्या जागेसाठी तत्वतः मंजुरी दिली तरी कर्जत बंद, कोणावर ईडीची कारवाई झाली तरी कर्जत बंद, सातत्याने कर्जत बंद करणाऱ्या या बंद बहाद्दरानी कन्नड साखर कारखान्याची मालमत्ता इडीने जप्त केल्यावर कर्जत बंद का केले नाही ? सवाल करत राजकीय भूमिका घेऊन कर्जत बंद करणाऱ्या राजकीय सुपारी बाजांवर आमदार प्रा.राम शिंदे यानी मार्मिक शब्दांत टीका केली. (Karjat MIDC ram shinde news)
वालवड सुतगिरणीबाबत योग्य व्यासपीठावर पोलखोल करणार – आमदार राम शिंदे
वालवड सुतगिरणी संदर्भातही प्रश्न उपस्थित करणाऱ्यांचाही आमदार शिंदे यांनी जोरदार समाचार घेतला.शिंदे म्हणाले की, वालवड सुतगिरणी सहकारी तत्वावर होती. भूमिपूजनाच्या वेळे मी जे बोललो आहे त्याचे व्हिडिओ आजही पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहेत. विरोधकांनी खातरजमा करावी. शासनाने या सहकारी सुतगिरणीसाठी 10 कोटी रुपये दिले होते, असे असताना मुख्य प्रवर्तक गुगळे यांनी सुतगिरणी बंद का केली ? त्यांना मविआ सरकार आल्यावर कोणी त्रास दिला? याची योग्य व्यासपीठावर पोलखोल करणार असल्याचा इशारा देत सिंचन विहिरींच्या चौकशीसाठी कोणी दबाव आणला ? याची माहिती कागदपत्रासहित जनतेपुढे मांडू असाही इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला. (Ram shinde latest news today)
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पाणी वाटपाचे नाटक
सेवाभावी संस्था पुढे करत मोफत पाणी पुरवठा करण्याचे नाटक करायचे आणि झेपत नाही म्हणून शासन परवानगी देत नाही अशी नौटंकी करून बंद करायचे, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तुम्ही पाणी वाटले तेव्हा निवडणुक असूनही तुम्हाला प्रतिबंध केला नाही, मग आता कशासाठी प्रतिबंध करायचा ? तुमच्या राजकारणासाठी जनतेला तुम्ही वेठीस धरू नका. तुम्ही जनतेला मोफत पाणी देऊ शकत नाहीत. (Ram Shinde rohit pawar news today)
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पाणी देण्याचे नाटक करता, आता त्याचा फारसा उपयोग होणार नाही हे तुमच्या लक्षात आल्यामुळे परवानगीचे नाटक करत तुम्ही पाणी बंद केले आहे. उन्हाळा दरवर्षी येतो. मग तुमचे पाणी वाटपाचे नाटक निवडणूक काळातच का सुरू होते. जनतेला गंडवायचे धंदे बंद करा. कर्जत जामखेडच्या स्वाभिमानी जनतेने तुमचा खरा चेहरा ओळखला आहे. त्यामुळे आता जनतेचे हिरं भाजून नका, जनता तुम्हाला मोठा धडा शकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा यावेळी शिंदे यांनी विरोधकांना दिला. (Ram Shinde news today)
दोन महिन्यात योजना कार्यान्वित करणार
तुकाई उपसा सिंचन योजनेची खिल्ली उडविली, पाण्यापासून या भागाला वंचित ठेवले, सरकार असताना विविध परवानग्याच्या नावाखाली योजना हेतुपुरस्पर बंद ठेवली, महायुतीचे सरकार आल्यानंतर मी योजनेला गती दिली.पुढील ओव्हर पलोच्या आवर्तनाला प्रत्येक तळ्यात पाणी सोडले जाईल असे म्हणत दोन महिन्यात योजना कार्यान्वित करणार असा ठाम विश्वास यावेळी शिंदे यांनी व्यक्त केला. (Ram Shinde news)
कर्जत MIDC मुळे कर्जतकरांच्या आयुष्यात येणार आर्थिक क्रांती
औद्योगिक वसाहत कर्जत तालुक्यासाठी मोजे कोंभळी, रवळगाव, थेरगाव या ठिकाणी महायुती सरकारने तत्वतः मान्यता दिली असून आता पुढील कायदेशीर प्रकिया थोड्याच दिवसांत पूर्ण होऊन एमआयडीसीचे भूमिपूजन होईल. लोकसभा निवडणुकीनंतर जून महिन्यात हा कार्यक्रम घेऊ. कोंभळी एमआयडीसी हा मिरजगाव परिसरासाठी अत्यंत दूरगामी परिणाम करणारा हा निर्णय आहे. अवर्षण प्रवण भागात एमआयडीसी होण्यामुळे या भागाचा कायापालट होणार आहे. एकूणच कर्जत तालुक्यातील युवकांना रोजगाराच्या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहेत.कर्जत तालुक्यातील जनतेच्या आयुष्यात नवा बदल यातून घडणार आहे.आर्थिक प्रगतीचे नवे वारे तालुक्यातील वाहणार आहे.कर्जत MIDC मुळे कर्जतकरांच्या आयुष्यात आर्थिक क्रांती येणार त्यामुळे कर्जत तालुक्यातील प्रत्येक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (Karjat MIDC news today)
यावेळी काकासाहेब तापकीर, अशोक खेडकर, अमृत लिंगडे, प्रशांत बुद्धिवंत, नितीन खेतमाळस, डॉ रमेशचंद्र झरकर, संदिप बुद्धिवंत (शहराध्यक्ष मिरजगाव),संपत बावडकर, लहू वतारे,नंदू नवले, तात्या खेडकर, दत्ता मुळे, काशिश्वर बुद्धिवंत, संतोष कोरडे, कैलास बोराडे, सारंग घोडेस्वार, हरिदास केदारी, सोमनाथ साबळे, संग्राम घोडके, साई अँग्रोचे माने, आदिसह परिसरातील नागरिक, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Karjat MIDC news today)