कर्जत- जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या संकल्पनेतून सप्तपदी अभियान अंतर्गत कर्जत-जामखेड तालुक्यातील सुमारे २० हजार हेक्टर पोटखराबा क्षेत्र लागवडीखाली येणार असल्याची माहिती प्रभारी प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. (20000 hectares under cultivation in Karjat Jamkhed)
जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या संकल्पनेतून सप्तपदी अभियान अंतर्गत पोटखराबा क्षेत्र लागवडीखाली आणणे हा सप्तपदी मोहिमेचा एक महत्वपूर्ण भाग आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे या अभियानात खंड पडला होता.आ रोहित पवार यांनी देखील या महसुल मोहिमेचे विशेष कौतुक केले होते.
यासह उर्वरीत पोटखराबा जे क्षेत्र लागवडी आणणे आवश्यक आहे याविषयी पाठपुरावा केला होता.याच अनुषंगाने कर्जत-जामखेड तालुक्यातील जवळपास सुमारे २० हजार हेक्टर पोटखराबा क्षेत्र लागवडी आणण्यासाठी कर्जत उपविभागीय कार्यालयाने नियोजन आखले आहे.(20000 hectares under cultivation in Karjat Jamkhed)
१५ सप्टेंबर ते २० नोव्हेंबर २०२१ या कालावधीमध्ये २० हजार हेक्टर क्षेत्र लागवडी खाली आणले जाणार आहे. यासह त्याची ७/१२ उताऱ्यावर नोंदणी केली जाणार आहे. तरी लाभार्थी शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी यांच्याशी संपर्क साधत या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रभारी प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी केले आहे.(20000 hectares under cultivation in Karjat Jamkhed)
पोटखराबा क्षेत्र लागवडी आणल्यामुळे शेतकरी वर्गास याचा मोठा फायदा मिळणार आहे. पीक विमा, पीक कर्ज, पीक नुकसान भरपाई यासह जमिनीचे मूल्याकन देखील वाढ होण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी या मोहिमेत सहभागी होत आपले पोटखराबा क्षेत्र लागवडी खाली आणण्यास महसुल प्रशासनास सहकार्य करावे