Petrol Price Hike | ते म्हणतात तुझी कशी जिरवली, भर आता शंभरचं : इंधन दरवाढीवरून अजित पवारांचा नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा

बारामती : Petrol Price Hike | इंधन दरवाढीने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल डिझेल दरवाढ होत आहे. याच इंधन दरवाढीवरून उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

अलीकडे कोणाचाही पेट्रोल पंप असला तरी तेथे त्यांचा ( पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा) फोटो लावायचाच असा नियम केला आहे. त्यामुळे आम्ही गंमतीने असे म्हणतो की पेट्रोल 100च्या पुढे गेलं की पेट्रोल भरताना तुम्ही त्यांच्याकडे बघायचं, मग ते म्हणतात कशी तुझी जिरवली… घाल आता 100 रुपयाचे पेट्रोल अशा शब्दात मिश्कील टीप्पणी करीत उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

वाढत्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य मेटाकुटीस आला आहे. त्यातच बहुतांश पेट्रोलपंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. यावेळी एमआयडीसीतील एका पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी केलेली मिश्कील टीप्पणी चर्चेचा विषय ठरली आहे.

यावेळी पवार म्हणाले, आम्ही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून अनेक उत्तम प्रकारे काम करणारे पंतप्रधान आपल्या देशाला मिळाल्याचे पाहिले. आता पंतप्रधान पदावर मोदी साहेब आहेत. त्यांनी अलीकडे कोणाचाही पेट्रोल पंप असला तरी तेथे त्यांचा (मोदींचा) फोटो लावायचाच असा नियम केला आहे.पेट्रोल भरताना त्यांच्याकडे बघायचं, मग ते म्हणतात कशी तुझी जिरवली. घाल आता 100 रुपयाचे पेट्रोल या पवार यांनी पंतप्रधानांना केलल्या टीपणीवर उपस्थिांमध्ये हशा पिकला.

वाढत्या इंधनदरावर सर्वसामान्य ग्राहक पेट्रोलपंपावर इंधन भरताना या ठीकाणी लावलेल्या पंतप्रधानांच्या फ्लेक्सकडे पाहत उपरोधिकपणे हात जोडल्याचे काही व्हीडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. आता खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मिश्कील टीप्पणी करीत दरवाढीकडे लक्ष वेधले आहे.

 

web tital : Ajit Pawar strongly targets Narendra Modi over petrol price hike