मोठी बातमी : महापुरात अडकलेल्या आनंदनगर तांडा गावातील 110 जणांची सुटका, आठ ते दहा तास सुरू होते बचावकार्य, SDRF टीमची यवतमाळमध्ये यशस्वी कामगिरी !
यवतमाळ : महाराष्ट्रात विदर्भ आणि कोकण किनारपट्टीवर पावसाने हाहाकार उडवून दिला आहे. पुढील दोन दिवस राज्याच्या अनेक भागांना रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.महाराष्ट्रातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे नद्यांना पुर आलाय. पुरामुळे अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झालेय.अश्यातच विदर्भाच्या यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील एका गावात पुरात 110 जण अडकले होते. या सर्वांची सुटका करण्यात SDRF च्या टिमला यश आले आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. (Mahagaon Flood News)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधीची माहिती ट्विट करून दिली आहे. यवतमाळ जिल्हा प्रशासनाकडून आताच प्राप्त माहितीनुसार, महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे अडकलेल्या सर्व 110 नागरिकांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. भारतीय हवाई दलाच्या देखरेखीत SDRF चमूने बोटींच्या साहाय्याने हे मिशन पूर्ण केले. संपूर्ण टीमचे अभिनंदन, असे ट्विट फडणवीस यांनी केले आहे. (Mahagaon Anandnagar Tanda flood latest update)
विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. यामुळे विदर्भातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. काही नद्यांना मोठा पुर आलाय. यवतमाळ जिल्ह्यातही पावसाने हाहाकार उडवून दिल्याने अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे. बेंबळा धरण ओव्हर फ्लो झाल्याने पुस नदीला मोठा पुर आलाय. या पुराचा वेढा महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा या गावाला पडला आहे.
तसेच वाघाडी गावात सुध्दा पुर पुर आलाय. महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा गावात आलेल्या पुरामुळे 110 नागरिक पुरात अडकले आहेत. अडकलेल्या नागरिकांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. या सर्वांच्या सुटकेसाठी सरकारने नौदलाचे 2 हेलिकॉप्टर घटनास्थळी पाठवले आहे. हेलिकॉप्टरच्या सहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन पार पाडले जात आहे. तसेच SDRF ची टीम सुध्दा याठिकाणी बचावकार्य करत आहे. (Yavatmal flood latest update today)
यवतमाळच्या वाघाडी, पैनगंगा आणि पुस नदीला महापुर आलाय. पुस नदीकाठी वसलेल्या आनंदनगर महागाव या गावाला पुराचा वेढा पडलाय. घराघरात पुराचे पाणी घुसले आहे. यामुळे जीव वाचवण्यासाठी नागरिकांची धडपड सुरूय. अनेक जण पुरात अडकले आहेत. काही जण सुरक्षित स्थळी स्थलांतरित झालेत. पुरात अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.
यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल यडगे (Amol Yedge IAS) यांनी याबाबत माहिती दिली. “हवाई दलाच्या हेलिकॉप्टरच्या माध्यामातून सर्व गावकऱ्यांचं रेस्क्यू केलं जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. यवतमाळमध्ये आज जवळपास 240 मिमी पाऊस पडला. वेगवेगळ्या तालुक्यातून 5 हजार पेक्षा जास्त नागरिकांची सुरक्षित स्थळी हलवलं आहेत. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी पुराच्या पाण्याच अडकलेल्या 200 नागरिकांना जिल्हा पथक आणि एसडीआरएफच्या मदतीने सुरक्षित रेस्क्यू केलं आहे”, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
“आता आनंदरच्या नागरिकांचं हेलिकॉप्टरच्या मदतीने रेस्क्यू केलं जात आहे. पूस आणि पैनगंगा नदीचा तिथे संगम आहे. तसेच तिथे एक नाला आहे. तिथले काही नागरीक आमच्या संपर्कात आहे”, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
यवतमाळ जिल्हा प्रशासनाकडून आताच प्राप्त माहितीनुसार, महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे अडकलेल्या सर्व 110 नागरिकांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. भारतीय हवाई दलाच्या देखरेखीत #SDRF चमूने बोटींच्या साहाय्याने हे मिशन पूर्ण केले. संपूर्ण टीमचे अभिनंदन असे ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.