Chandrayaan-3 Landing Update : अवघ्या काही तासांत इतिहास घडणार, सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटाला ISRO घडवणार इतिहास, इस्त्रोच्या मदतीला धावल्या NASA व ESA या अंतराळ संस्था, नेमकं काय घडतयं वाचा सविस्तर
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : भारताच्या चांद्रयान-3 या चांद्र मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. करोडो भारतीयांच्या साक्षीने,भारत देश ऐतिहासिक कामगिरी करण्यासाठ सज्ज झालाय. आज सायंकाळी भारताच्या चांद्रयान-3 चे विक्रम लॅंडर चंद्रावर सॉफ्ट लॅंडींग करणार आहे. या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी भारतीय सज्ज झालेत. चांद्रयानच्या साॅफ्ट लँडींगवर जगभरातील शास्त्रज्ञांचेही याकडे लक्ष असणार आहे.
बुधवारी सायंकाळी 5 वाजून 45 मिनिटाला विक्रम लॅंडर चंद्राच्या दिशेने साॅप्ट लँडींग करण्यास सुरूवात करेल. 6 वाजून 4 मिनिटाला विक्रम लॅंडर चंद्रावर सॉफ्ट लॅंडींग करेल. इस्त्रोकडून ही प्रकिया राबवली जाईल.चंद्राच्या दक्षिण धुव्रावर साॅफ्ट लँडींग यशस्वी झाल्यास अशी कामगिरी करणारा भारत हा जगातला पहिला देश ठरेल. चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर विक्रम लॅंडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर पडेल. तो चंद्रावर चालेल. तो तेथील वातावरणाची माहिती घेण्यास सुरूवात करेल. माती, पाणी, बर्फ व नैसर्गिक संसाधने याची माहिती संकलित केली जाणार आहे.
दरम्यान, भारताचे चांद्रयान 3 हे चंद्राच्या दक्षिण भागात उतरणार आहे. हा संपुर्ण काळोख्या प्रदेशाचा आहे. येथे नेहमी अंधार असतो. आजवर जगातल्या अनेक देशांनी ज्या चांद्रमोहिमा केल्या आहेत, त्या सर्व उजेडाच्या प्रदेशात केल्या आहेत. भारतासह रशियाने दक्षिण धुव्रावर अंतराळयान उतरवण्याची मोहिम आखली होती. परंतू दुर्दैवाने रशियाचे लुना 25 हे अंतराळयान चंद्रावर कोसळले. यापुर्वी भारताचे चांद्रयान 2 हे चंद्रावर कोसळले होते. आता चांद्रयान 3 चंद्रापासून अवघ्या काही पावलांपासून दुर आहे. काही गडबड होऊ नये यासाठी नासा आणि इसा या दोन्ही अंतराळ संस्था इस्त्रोच्या मदतीला धावून आल्या आहेत.
नासा आणि इसा अंतराळ संस्था इस्त्रोच्या मदतीला
नासाचे स्वतःचे मोठे अंतराळ नेटवर्क आहे. त्यांनी जगाच्या विविध कानाकोपऱ्यात प्रचंड मोठे रेडिओ अँटेना लावले आहेत. ESA चे स्वतःचे आंतरराष्ट्रीय उपग्रह ट्रॅकिंग नेटवर्क आहे, ज्याला ASTRAC म्हणतात. ASTRAC ही ग्राउंड स्टेशन्सची एक जागतिक प्रणाली आहे जी कक्षेमधील उपग्रह आणि जर्मनीतील डार्मस्टॅडमधील युरोपियन स्पेस ऑपरेशन्स सेंटर दरम्यान कनेक्टिव्हिटी प्रदान करते. कोर ESTRACE नेटवर्कमध्ये सात देशांतील सात स्थानके आहेत. इस्त्रोच्या या अँटेनाच्या कव्हरेजबाहेर जर उपग्रह, यान गेले तर याच दोन संस्थांची मदत घेतली जाते.
लँडरला चंद्राच्या पृष्ठभागावरील ऑपरेशन्समध्ये सपोर्ट केला जाईल, रोव्हरचा डेटा सुरक्षितपणे भारतातील इस्रोकडे प्रसारित केला जाईल, असे इसाने सांगितले. कर्नाटकातील ब्यालालू या गावात इस्रोचे स्पेस ट्रॅकिंग स्टेशन आहे. अमेरिका आणि युरोपमधून लँडर विक्रम आणि चंद्रयानाचा डेटा इकडे पाठविला जाणार आहे.
चंद्रावर लॅण्डिगची शेवटची १५ मिनिटे खूप महत्त्वाची
अंतराळ तज्ज्ञ प्रोफेसर आर सी कपूर यांनी सांगितले की, चंद्रावर लॅण्डिगची शेवटची १५ मिनिटे खूप महत्त्वाची असतील. चांद्रयान-३ पहिल्या टप्प्यात उतरण्यास सुरुवात करेल तेव्हा त्याचा वेग १६८३ मीटर प्रति सेकंद असेल. या वेगाने, ते ७.४ किमी उंचीपर्यंत खाली आणले जाईल. त्यानंतर लॅण्डरचा वेग ३७५ मीटर प्रति सेकंद इतका कमी होईल. येथे विक्रम लॅण्डरची उंची निश्चित केली जाईल म्हणजेच ते झुकवले जाईल. त्यानंतर ते १३०० मीटर उंचीवर आणले जाईल. त्यानुसार चंद्राच्या पृष्ठभागावर जाण्याचा वेग हळूहळू कमी होईल. नंतर तो ४०० मीटर, १५० मीटर आणि नंतर ५० मीटरपर्यंत आणला जाईल. शेवटी १० मीटरवर आल्यानंतर अंतिम लॅण्डिग होईल. यावेळी लॅण्डरचा वेग २ मीटर प्रति सेकंद इतका असेल.