India vs Pakistan match turning points | भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातील ‘ते’ दोन चेंडू ठरले भारताच्या विजयाचे टर्निंग पाॅईंट ! विराट कोहलीच्या जिगरबाज खेळीने भारतात दिवाळीचा डबल धमाका !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : India vs Pakistan match turning points। भारतात दिवाळी सणाचा उत्साह शिगेला पोहचलेला असतानाच तिकडे ऑस्ट्रेलियात भारतीय संघाने पाकिस्तान विरुद्धच्या (India vs Pakistan) रोमहर्षक सामन्यात दणदणीत विजय मिळवला. भारतीय संघाच्या या विजयामुळे भारतात दिवाळीचा मोठा धमाका झाला, तर पाकिस्तानवर शिमगा साजरा करण्याची वेळ आली. शेवटच्या षटकात विराट कोहलीने दाखवलेली समय सुचकता भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारी ठरली.शेवटच्या षटकातले ‘दोन’ चेंडू पाकिस्तानला उध्वस्त करण्यासाठी कारणीभूत ठरले. हेच दोन चेंडू भारताच्या विजयासाठी टर्निंग पाॅईंट ठरले.

India vs Pakistan match turning points, Those two balls in India vs Pakistan match became the turning point of India's victory, Double bang of Diwali in India with Virat Kohli's brilliant game,
Photo Credit: ICC twitter

T20 विश्‍वचषकातील सुपर 12 गटातील सर्वात हाय व्होल्टेज मॅच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी संघातील सामना ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर रविवारी पार पडला. एक लाख प्रेक्षकांसमोर खेळला गेलेला हा सामना अतिशय रोमांचक ठरला. हा सामना विराट कोहलीने गाजवला. शेवटच्या षटकापर्यंत चाललेल्या या अतितटीच्या सामन्यात विराट कोहलीने दिलेली झुंज संघाला विजय मिळवून देऊन गेली. आणि भारतीय संघाने नवा इतिहास रचला.

शेवटच्या षटकातील दोन चेंडूने पाकिस्तानच्या विजयाचा घासच हिरावून घेतला. हे दोन दोन भारताच्या विजयातील महत्वाचे टर्निंग पाॅईंट ठरले. यातील एका चेंडूवर विराट कोहलीने मारलेला उत्तुंग षटकार सामन्याचे चित्रच पालटवून टाकणारा ठरला. शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी 16 धावा हव्या होत्या. यावेळी मैदानावर होता हार्दिक पंड्या, मोठ्या फटका खेळण्याच्या नादात तो बाद झाला.

India vs Pakistan match turning points, Those two balls in India vs Pakistan match became the turning point of India's victory, Double bang of Diwali in India with Virat Kohli's brilliant game,
PHOTO CREDIT : ICC (Twitter)

त्यानंतर दिनेश कार्तिकने दुसऱ्या चेंडूंवर एक धाव घेतली. तिसऱ्या चेंडूंवर विराट कोहलीने दोन धावा वसुल केल्या. आता तीन चेंडूत विजयासाठी 13 धावांची आवश्यकता होती. दोन्ही संघ तणावात होते. सामना भारताच्या हातून निसटलाय की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. तेवढ्यात पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद नवाजने सामन्याचा चौथा चेंडू टाकला गेला. फुलटॉस चेंडूवर विराटने उत्तुंग षटकार मारला. त्याचबरोबर या चेंडूची उंची कमरेच्या वर होती अशी तक्रार पंचाकडे केली. पंचांनी तो नो बाॅल जाहीर केला. यावेळी मोठा गोंधळ उडाला होता. पाकिस्तानी खेळाडूनी पंचाची बराच वेळ वाद घातला, मात्र पंचांनी आपला निर्णय कायम ठेवला.

India vs Pakistan match turning points, Those two balls in India vs Pakistan match became the turning point of India's victory, Double bang of Diwali in India with Virat Kohli's brilliant game,
PHOTO CREDIT : ICC (Twitter)

आता भारतीय संघाला विजयासाठी दोन चेंडूत सहा धावांची आवश्यकता होती. आता दडपण पाकिस्तान संघावर होते. यावेळी पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद नवाजने टाकलेला पाचवा चेंडू वाईड ठरला. त्यामुळे विजयाचे गणित पुन्हा बदलले. दोन चेंडूत पाच धावा. पुन्हा पाचवा चेंडू टाकला गेला.यावर मोठा फटका खेळण्याच्या नादात विराट क्लिन बोल्ड झाला खरा, पण मैदानात विराट मात्र धावा काढण्यासाठी पळत सुटला होता. विराट कोहली आणि दिनेश कार्तिकने पळून तीन धावा काढल्या. विराटच्या समय सुचकतेने भारतीय संघाच्या विजयाचा पाया रचला जाण्यासाठी हा दुसरा चेंडू टर्निंग पाॅईंट ठरला.

India vs Pakistan match turning points, Those two balls in India vs Pakistan match became the turning point of India's victory, Double bang of Diwali in India with Virat Kohli's brilliant game,
PHOTO CREDIT : ICC (Twitter)

एकिकडे विराट बोल्ड झाल्याने पाकिस्तानी खेळाडू जल्लोष करत असताना विराट आणि डीके मैदाना धावा काढत होती. एक वेळ अशी आली रोहित शर्मालाही काय झाले हे कळेना. मात्र, सामन्याचा जो चौथा चेंडू नो बाॅल देण्यात आला होता, त्या चेंडूनंतर येणारा पाचवा चेंडू हा फ्री हिटसाठी होता, परंतू तो वाईड टाकला गेल्याने पुढच्या चेंडूवर फ्री हिट पास झाली. त्यामुळे फ्रि हिटवर कॅच अथवा बोल्ड झाला तरी खेळाडू बाद होत नाही, याचाच फायदा उचलून विराटने बोल्ड झाल्यानंतरही डीके सोबत धावून तीन धावा वसुल केल्या, आणि सामना भारताच्या बाजूने वळवला.

आता शेवटच्या दोन चेंडूत दोन धावांची आवश्यकता होती. यावेळी दिनेश कार्तिक मोठा फटका खेळण्याच्या नादात बाद झाला. आता एक चेंडूत दोन धावांची गरज असताना भारतीय गोलंदाज आर अश्विन मैदानात आला. सामना टाय होणार का ? शेवटच्या चेंडूवर अश्विनला बाद करून पाकिस्तान जिंकणार का? की अश्विन शेवटच्या चेंडूवर इतिहास घडवणार याची उत्कंठा शिगेला पोहचली होती. 

मात्र शेवटचा चेंडू वाईड टाकला गेला. मात्र आता विजय भारताच्या खिश्यात आल्यासारखा होता, यावेळी शेवटच्या चेंडूवर एका धावेची गरज असताना अश्विनने चौकार मारत विजयावर शिक्कामोर्तब केले. आणि भारतीय खेळाडू आणि प्रेक्षकांनी विजयी जल्लोष साजरा केला.

भारतीय संघाने विजय मिळवताच देशभरात फटाक्यांची आतिषबाजी झाली. भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. लक्ष्मीपूजनाच्या आधीच भारतीय संघांने दिवाळीचे मोठे गिफ्ट दिले. देशातील नागरिकांनी पाकिस्तानवर मिळवलेल्या दणदणीत विजयाचा उत्सव धुमधडाक्यात साजरा केला.