खालापूर : इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत 25 जणांचा मृत्यू तर 143 जणांना वाचविण्यात यश, 100 पेक्षा अधिक बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू, तिसऱ्या दिवशी बचावकार्य युद्धपातळीवर सुरुच !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : वातावरणातील बदलांमुळे पश्चिम घाटात निसर्गाचा प्रकोप सुरू आहे. दरवर्षी दरडी कोसळण्याच्या घटना वाढत आहेत. माळीण, तळीये येथे दरडी कोसळून अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना यापुर्वी घडल्या. बुधवारी रात्री इर्शाळवाडीवर दरड कोसळली. या घटनेत अत्तापर्यंत 25 जणांचा मृत्यू झालाय. तर 21 जण जखमी झाले आहेत. तर 86 नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. सलग तिसऱ्या दिवशी NDRF व स्थानिकांचे मदतीने इर्शाळवाडीत बचावकार्य सुरूच आहे.
रायगड जिल्ह्यातील खालापुर, इर्शाळवाडी – इर्शाळगड या भागात सलग तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहेत. अतिवृष्टीमुळे या भागात दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. इर्शाळवाडीवर डोंगराचा एक भाग कोसळून अख्खं गाव मातीच्या मलब्यात गाडलं गेलं. या घटनेत 25 जणांचा मृत्यू झालाय. अत्तापर्यंत 120 जणांचा शोध घेण्यात यश आलं आहे. तर 86 जण अजूनही बेपत्ता आहेत. बेपत्ता नागरिकांचा वेगाने शोध सुरू आहे. 21 जखमींवर उपचार सुरु आहेत. सतत पडत असलेला मुसळधार पाऊस आणि दाट धुके यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. परंतू बचावपथकांकडून निकराने बचावकार्य सुरु आहे.
इर्शाळवाडी दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे
रमेश हरी भवर वय 25, जयश्री रमेश भवर वय 22, रूद्रा रमेश भवर वय 1, विनोद भगवान भवर वय 4, जिजा भगवान भवर वय 23, बाळू नामा पारधी वय 55, अंबी बाळू पारधी वय 45, सुमित भास्कर पारधी वय 3, सुदाम तुकाराम पारधी वय 18, दादा सांगु भवर वय 40, चंद्रकांत किसन वाघ वय 17, राधी दामा भवर वय 37, बाळी नामा भुतांब्रा वय 70, भास्कर बाळू पारधी वय 38, पिंकी ऊर्फ जयश्री भास्कर पारधी, अन्वी भास्कर पारधी वय 1, कमळ मधू भुतांब्रा वय 43, कान्ही रवी वाघ वय 45, हासी पांडुरंग पारधी वय 55, पांडुरंग भाऊ पारधी वय 65, मधू नामा भुतांब्रा वय 45, रविंद्र पदू वाघ वय 46, अशी मृतांची नावे आहेत.
इरशालवाडी गावांतील नागरिकांचा शोध घेण्यासाठी खालील समिती स्थापन
रायगड जिल्ह्यातील मौजे इरशालवाडी येथे दरड कोसळल्यामुळे सदर गावांतील 43 कुटुंबातील 229 लोकांपैकी 143 व्यक्तींचा शोध घेण्यात आला असून अद्यापही 86 नागरिकांचा शोध कार्य सुरु आहे. सदर घटनेमध्ये आपले नातेवाईक गमावल्याने स्थानिक नागरिकांवरती मोठा मानसिक आघात झाला आहे. नातेवाईकांमध्ये भिंतीचे वातावरण असल्याने काही नागरीक समोर आलेले नाहीत. तरी मौजे इरशालवाडी गावांतील नागरिकांचा शोध घेण्यासाठी खालील समिती स्थापन करण्यांत आली असून जिल्ह्यातील इतर नागरिकांनी व त्यांचे नातेवाईकांनी इरशालवाडी येथील नागरिकांची काही माहिती असल्यास दूरध्वनीव्दारे संपर्क साधावा अथवा पोलीस स्टेशन चौक, ता. खालापूर प्रत्यक्ष भेटावे.
दिक्षांत देशपांडे तहसिलदार माथेरान – 8669056492
शितल राऊत, पोलीस अधिकारी – 9850756595
सतिश शेरमकर, सहा. प्रकल्प अधिकारी – 9403060273