Kopargaon News : कोपरगावात पेट्रोल पंपावरील मॅनेजरची हत्या, खुनाच्या घटनेने उडाली मोठी खळबळ, हत्येचा थरार सीसीटिव्हीत कैद ! पहा VIDEO
जामखेड टाइम्स वृत्तसेवा, कोपरगाव, 30 जून 2023 : पेट्रोल पंपावरील मॅनेजरची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातून समोर आला आहे. किरकोळ वादातून अज्ञातांनी ही हत्या केली. या घटनेचा सीसीटिव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. (Petrol pump manager was killed in Gururaj HP Petrol Pump Sanwastar Kopargaon)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील गुरुराज एच पी पेट्रोल पंपावर (Gururaj HP Petrol Pump Sanwastar) गुरुवारी रात्री 7 वाजेच्या सुमारास अज्ञात तरूण पेट्रोल भरण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांचा पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांशी वाद झाला. हा वाद सोडवण्यासाठी पेट्रोल पंपावरील मॅनेजर यांनी मध्यस्थी केली पण हा वाद आणखीन वाढला. या वादाचे रूपांतरण हाणामारीत झाले. यावेळी संतापलेल्या अज्ञातांनी धारधार शस्त्राने सपासप वार करून मॅनेजरची हत्या केली. तसेच पंपाजवळील हाॅटेलमधील कर्मचारी या हल्ल्यात जखमी झाला आहे.(Kopargaon Latest news Today)
दरम्यान, घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले आहेत. किरकोळ वादातून घडलेल्या या हत्याकांडात भोजराज बाबूराव घनघाव (Bhojraj Baburao Ghanghav) (वय 40) या मॅनेजरचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जखमींवर उपचार सुरु आहेत. या घटनेतील आरोपींचा सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांकडून वेगाने शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे कोपरगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचे वृत्त न्यूज 18 लोकमतने दिले आहे. (Kopargaon Crime News Latest)