nmms scholarship | जामखेडच्या श्रावणी माने सह 09 विद्यार्थ्यीनी शिष्यवृत्तीस पात्र ! Jamkhed Times News

NMMS Scholarship निकालात कन्या विद्यालयाचा डंका

 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : एप्रिल २०२१ रोजी पार पडलेल्या nmms scholarship परीक्षेचा निकाल जाहिर झाला आहे. यात जामखेड येथील श्रावणी सतिश माने या विद्यार्थिनीने घवघवीत यश मिळवले आहे. ती शिष्यवृत्तीस पात्र ठरली आहे.  श्रावणीचे वडिल सतिश माने हे नाभिक व्यवसायिक असुन ते मुलींच्या शिक्षणासाठी कठोर मेहनत घेत आहेत. त्यांच्या मेहनतीला आता यश येताना दिसत आहे. वैष्णवीला मोठे अधिकारी बनवण्याचे स्वप्न माने कुटुंबाचे आहे.

nmms scholarship परीक्षेसाठी जामखेडच्या कन्या विद्यालयातील २८ विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता. त्यात २२ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत. शाळेचा ८८ टक्के निकाल लागला आहे.श्रावणी सतीश माने ,संध्या सदगुरु काशिद,सानिका सुग्रीव गोंदवले, संस्कृती योगेश जसाभाटी,पायल फारुख शेख, प्रिया सोनबा कोल्हे, उतेकर प्रेरणा विश्वंभर, वृषाली संजय रेडे, वैष्णवी अशोक होडशीळ या ०९ विद्यार्थीनी शिष्यवृत्तीस पात्र ठरल्या आहेत. या विद्यार्थिनींना दरवर्षी १२ हजार रूपयांची शिष्यवृत्ती सलग चार वर्षे प्राप्त होणार आहे. (nmms scholarship amount 2021)

या विद्यार्थिनीना बाबासाहेब आंधळे, विलास पवार बाळकृष्ण देशमुख, शारदा बोळे, मिरा साळुंके, रश्मी मुसळे, विशाखा ससाणे,गुरुकुल विभागप्रमुख दिलीप ढवळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांचेरयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आमदार रोहित पवार, मुख्याध्यपिकी चौधरी के.डी, सोनवणे पी. डी.सह आदींनी अभिनंदन केले आहे.