World cup 2023 Raund Robin : यंदाचा विश्वचषक राउंड रॉबिन पद्धतीने होणार, राउंड रॉबिन फॉर्मेट म्हणजे काय? जाणून घ्या सविस्तर
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : भारतात 5 ऑक्टोबर 2023 पासून आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. वर्ल्डकप सामन्यांचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले. यंदा होणारी स्पर्धा राऊंड राॅबीन आणि नाॅकआऊट पध्दतीने खेळवली जाणार आहेत. यात प्रत्येक संघ 9 सामने खेळताना दिसणार. वर्ल्डकप स्पर्धेचे सामने भारतातील दहा शहरांमध्ये होणार आहेत.
प्रत्येक संघाला 9 सामने खेळावे लागणार आहेत. वनडे क्रिकेट विश्वचषकात तिसऱ्यांदा राउंड रॉबिन पद्धतीने स्पर्धा होत आहे. याआधी 2019 आणि 1992 मध्ये राउंड रॉबिन आणि नॉकआउट पद्धतीने विश्वचषक स्पर्धा झाली होती. 2019 मध्ये इंग्लंडने तर 1992 मध्ये पाकिस्तानने विश्वचषक उंचावला होता.
राउंड रॉबिन फॉर्मेट काय आहे ?
राउंड रॉबिन आणि नॉकआउट पद्धतीने सर्वात आधी 1992 मध्ये विश्वचषक स्पर्धा झाली होती. राउंड रॉबिन पद्धत म्हणजे, या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाची एकमेकांशी लढत होते. यात कोणत्याही संघाला कमी किंवा जास्त करता येत नाही. प्रत्येक संघाला त्यांची ताकद अजमावण्याची संधी मिळते. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान या संघांना दावेदार मानलं जात आहे. मात्र, बांगलादेश, अफगाणिस्तान अथवा इतर कोणताही कमकुवत संघ टॉप 4 मध्ये पोहचू शकतो. सेमीफायनलमध्ये पोहचल्यानंतर नॉकआऊट पद्धतीने सामने होतील. पहिल्या क्रमांकावर असणारा संघ चौथ्या स्थानावर असलेल्या संघासोबत खेळेल तर दुसऱ्या क्रमांकाचा संघ तिसऱ्या संघासोबत खेळेल. त्यानंतर विजेत्या दोन संघामध्ये फायनलचा थरार रंगेल.
यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघाचं संपूर्ण वेळापत्रक पाहा –
8 ऑक्टोबर 2023 – भारत vs ऑस्ट्रेलिया, चेन्नई (India vs Australia)
11 ऑक्टोबर 2023– भारत vs अफगाणिस्तान, दिल्ली (India vs Afghanistan)
15 ऑक्टोबर 2023 – भारत vs पाकिस्तान, नरेंद्र मोदी स्टेडिअम, अहमदाबाद (India vs Pakistan)
19 ऑक्टोबर 2023 – भारत vs बांगलादेश, पुणे (India vs Bangladesh)
22 ऑक्टोबर 2023 – भारत vs न्यूझीलंड, धर्मशाला (India vs New Zealand)
29 ऑक्टोबर 2023 – भारत vs इंग्लंड , लखनौ (India vs England)
2 नोव्हेंबर 2023 – भारत vs Qualifier 2, मुंबई
5 नोव्हेंबर 2023 – भारत vs दक्षिण आफ्रिका, कोलकाता (India vs South Africa)
11 नोव्हेंबर 2023 – भारत vs Qualifier 1, बेंगलोर